मुंबई : मुंबईतील गिरगाव येथे मुंबई पोलिसांनी धाड टाकून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणात दोन अभिनेत्रींसह एक महिला मेकअप...
मुंबई : मुंबईतील गिरगाव येथे मुंबई पोलिसांनी धाड टाकून हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणात दोन अभिनेत्रींसह एक महिला मेकअप आर्टिस्टचा समावेश असल्याचे समोर आले. मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट ४ ने गिरगावमधील एका बड्या हॉटेलमध्ये छापेमारी करत देहविक्रीचे रॅकेट उध्वस्त केले.या प्रकारामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ पसरली असून या प्रकरणी अभिनेत्रींकडून एका रात्रीचे २ लाख रुपये घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गिरगाव परिसरात एका बड्या हॉटेलमध्ये मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट ४ ने ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून देहव्यापारात गुंतलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. तसेच दोन्ही अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका महिला मेकअप आर्टिस्टला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात, आरोपी महिलेने दोन्ही अभिनेत्रींचा दोन लाखांत सौदा केल्याची माहिती समोर आली. ज्यामध्ये एका रात्रीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये घेण्यात आले होते. देहविक्रीचा सौदा झाल्यानंतर आरोपी मेकअप आर्टिस्ट महिलेने दोन्ही अभिनेत्रीं गिरगाव येथील हॉटेलमध्ये घेऊन गेली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी छापा टाकत आरोपी महिलेला अटक करत दोन्ही अभिनेत्रींची सुटका केली.
मुंबईतील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणातील सुटका करण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मराठीतील मुख्य अभिनेत्री असून दुसरी अभिनेत्री बंगाली असून तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी अभिनेत्री ग्रामीण भागातील असून चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला आली होती. परंतु तिला पैशांचं आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याचे समोर आले. तथापि, या घटनेचा मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.


COMMENTS