ताई, रडायचं नाही, आता लढायचं. सुषमा अंधारेंसाठी खास पत्र; सोशल मीडियावर तुफान चर्चा | CrimeNama
Loading ...

ताई, रडायचं नाही, आता लढायचं. सुषमा अंधारेंसाठी खास पत्र; सोशल मीडियावर तुफान चर्चा

  ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता अनेकांनी बोलून दाखवली. ठाकरे सेनेच्या उ...

 


ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता अनेकांनी बोलून दाखवली. ठाकरे सेनेच्या उपनेत्या आणि फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनीही ही अस्वस्थता बोलून दाखवली होती.यावेळी त्या भावनिकही झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूही आले. त्यामुळे अनेक शिवसैनिक अस्वस्थ झाले. सोलापूरचे युवासेना करमाळा तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी सुषमा अंधारे यांना “ताई, रडायचं नाही… लढायचं!” या मथळ्याखाली पत्र पाठवले आहे. सध्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे .हे पत्र सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे


शंभूराजे फरतडे यांनी या पत्रात नाव-चिन्ह गेल्यानंतरही 9 खासदार निवडून आणल्याची आठवण करून दिली. अंधारेंनी अडचणीच्या काळात केलेला पक्ष प्रवेश आणि महाराष्ट्रभर फिरून पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचा गौरव करत आता विजयी लोकच गद्दार होत असतील तर शिवसैनिकांचा बांध फुटणे सहाजिकच आहे. पण आता ही वेळ रडायची नसून लढायची असल्याचे म्हटले आहे.


फक्त राख बाजूला करा…


सोलापूर जिल्हा पुन्हा भगवामय करावा, निष्क्रिय आणि पक्ष खच्चीकरण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर निर्णय घ्यावेत, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. तसेच सर्वांना माना सन्मानाने सक्रिय करा. जे नाराज असतील किंवा तुमच्या कार्यपद्धतीवर नाराज असतील तर त्यांच्याशी इगो बाजूस ठेवून संवाद साधा.त्यांच्या भावना समजून घ्या ,त्यांनी देखील पक्षासाठी खास्ता खालल्या आहेत असे म्हटले आहे. “शिवसैनिक अंगार आहे, फक्त त्यावरची राख बाजूला करा” असा बाणेदार सल्ला देत हा सोलापूर जिल्हा पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करू, असा निर्धारही व्यक्त केला आहे.


शंभुराजे फडतरेंचं पत्र जसंच्या तसं…



ताई, रडायचं नाही… लढायचं !


प्रति,


सौ. सुषमाताई अंधारे, उपनेत्या व संपर्कप्रमुख, सोलापूर जिल्हा.


शिवसेनेचा नुकताच हिरक महोत्सवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडला. या हिरक महोत्सवी वर्धापनदिनाला नजर लावण्यांचे काम काही नतद्रष्ट लोकांनी केले. हिन्याप्रमाणे चमकणान्या शिवसेनेचे तेज कमी करण्याचा प्रयत्न केला. एकदा नव्हे, दोनदा … पण यावेळचा हा घाव सर्वांनाच वर्मी बसला.


नाव, चिन्ह चोरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी जिवाचे रान केले. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि शिवसैनिकांच्या कष्टांच्या जोरावर पुन्हा एकदा 1 खासदार निवडून आणून हा भगवा डौलाने फडकवला.


एखा‌द्या सत्ताधारी पक्षात अनेक प्रवेश होतात, मात्र सगळं संपलंय असं चित्र निर्माण झालं असताना तुम्ही केलेले पक्षप्रवेश हेच तुमच्या इमानदारीचा व लढवय्या वृत्तीचा संदेश देणारे होते. प्रवेशांच्या दिवसांपासून तुम्हीं पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरलात, वातावरण तयार केलंत. त्याचा प्रचंड फायदा लोकसभा निवडणुकीत झाला, विधानसभा निवडणुकीत झाला, नगरपालिकांमध्ये झाला. मात्र आज तेच विजयी झालेले लोक जर गडदार होणार असतील, नेतृत्वावर टीका करत असतील आणि त्यामुळे नेतृत्व राजीनाम्याच्या भूमिकेवर येत असेल, तर एका निष्ठावंत, संवेदनशील मनाच्या शिवसैनिकाचा बांध फुटणार हे नक्कीच होतं. अनेकांचे डोळे त्या दिवशी पाणावले होते.


मात्र आता जे झेलं ते झालं. तुम्ही लढाऊ रणरागिणी आहात, तुम्हाला लढताना बधायचं आहे, रडताना नाही… बाळासाहेबांचाच संदेश आहे “रडायचं नाही, लढायचं!” तेव्हा आता तुम्ही खंबीर व्हा… तुमच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे. कधी काळी या जिल्ह्यात 4 आमदार होते, शहरात अनेक नगरसेवक होते.


आजही या जिल्‌ह्यात निष्ठावंत शिवसैनिकांची मोठी फळी आहे. मात्र पदाधिकान्यांनी स्वतःला मर्यादित ठेवले आहे. त्यांच्या मनात या क्षेत्रापुढे आपली धाव जातच नाही, तर कशाला खाठेप करायचा असा न्यूनगंड निर्माण झाला आहे. तर काहींच्या मनात आपल्यापुढे कोणी जाऊच नये, पक्ष आपल्यापुरताच मर्यादित राहावा अशी संकुचित भावना निर्माण झाली आहे.


अनेक वर्षापासून काहीजण पदाला चिकटून बसले आहेत, जसे ढेपेला मुंगळां. पदाचा उपयोग पक्ष वाढीसाठी असतो की प्रपंच की प्रपंच वाढीसाठी, हा प्रश्न उभा राहतो, कारण पक्ष वाढला नाही, मात्र यांचे प्रपंच मोठे झाले. असो, हा ज्याचा त्याचा कर्मयोग.


 


पण आत्ता सांगायचा मुद्दा एकच आहे आता तुम्हीं हा जिल्हा पुन्हा भगवामय करावा. कोणाला पदावरून काढायचं, कोणाला ठेवायचं, कोणाला बढती घ्यायची याचा सविस्तर आढावा घेऊन सर्वांना मानसन्मानाने सक्रिय करा. कोणाची तुमच्या कार्यपद्धदतीवर नाराजी असेल तर त्यांच्याशी इंगो न धरता बोला. शेवटी त्यांनीही पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांची समजूत काढणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे.

म्हणून या जिल्ह्यात ठाकरेंची ताकद बाढवण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी काही कठोर निर्णग घ्यायची वेळ आली तरी घ्या. कारण सोडून जाणारे जेवढे गदार आहेत, तेवढेच पदं घेऊन निष्क्रिय राहणारे आणि शिवसैनिक युवासैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणारे सुद्धा गद्दार आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त करा.


या जिल्ह्यातील शिवसैनिक अंगार आहे, पण आता त्याच्यावर राख साचली आहे. तुम्ही फुंकर मारून तो अंगार पुन्हा पेटवा. आपण रक्ताचं पाणी करू आणि हा जिल्हा पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला तयार करू !


आपलाच,


शंभूराजे शाहुराव करतडे (पत्रकार) युवासेना तालुकाप्रमुख, करमाळा.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4732,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1739,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,494,India,936,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,366,Maharashtra,2079,Mumbai,529,Nagpur,75,Nashik,83,Politics,721,Politics.,5,Pune,2049,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,75,Technology,54,World,119,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: ताई, रडायचं नाही, आता लढायचं. सुषमा अंधारेंसाठी खास पत्र; सोशल मीडियावर तुफान चर्चा
ताई, रडायचं नाही, आता लढायचं. सुषमा अंधारेंसाठी खास पत्र; सोशल मीडियावर तुफान चर्चा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzsK5ucAJ9LUhTQTVnQWN-D-UssqByOvAJoVNbSObviuPLW2I1NbDmQTJmkX4uCBs50-8eROhSVeszL1IxOwYdlT2_boAl1F5k-BjRBTMi9dfm37Axl1N28G20O7MOV91p0E4cGzY-rM9c9_W3RmKbB9SefK9ji9HBbQxXSuDbSvVYL2JMLoqGTJEOc1s/s320/n7170560151782198373414d2a4ad63d41a593c02928bc83201df0ab89b63f631c25c0a9101f8f1993019f7.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzsK5ucAJ9LUhTQTVnQWN-D-UssqByOvAJoVNbSObviuPLW2I1NbDmQTJmkX4uCBs50-8eROhSVeszL1IxOwYdlT2_boAl1F5k-BjRBTMi9dfm37Axl1N28G20O7MOV91p0E4cGzY-rM9c9_W3RmKbB9SefK9ji9HBbQxXSuDbSvVYL2JMLoqGTJEOc1s/s72-c/n7170560151782198373414d2a4ad63d41a593c02928bc83201df0ab89b63f631c25c0a9101f8f1993019f7.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_927.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_927.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content