घरच्या ओढीने निघालेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला, स्कूलबसवर झाड कोसळून करुण अंत, ऑफिसमध्येच आईवर दुःखाचा डोंगर | CrimeNama
Loading ...

घरच्या ओढीने निघालेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला, स्कूलबसवर झाड कोसळून करुण अंत, ऑफिसमध्येच आईवर दुःखाचा डोंगर

  मुंबई : चेंबूरमधील ११ वी गल्ली दिवसाच्या कुठल्याही वेळी तशी शांतच असते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पडणारा मुसळधार पाऊस वगळता ही गल्ली मं...

 


मुंबई : चेंबूरमधील ११ वी गल्ली दिवसाच्या कुठल्याही वेळी तशी शांतच असते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पडणारा मुसळधार पाऊस वगळता ही गल्ली मंगळवारीही तशी शांतच होती. मात्र, या गल्लीतील हेरिटेज हाइट्स आणि रागिणी या दोन इमारतींच्या बाहेर असलेला एक पिंपळाचा वृक्ष कोसळला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूल बसवर पडला.महिनाअखेर असल्याने अर्ध्या दिवसाने सुटलेल्या युनिव्हर्सल हायस्कूलच्या १४ मुलांना घेऊन ही बस निघाली होती. त्यापैकी दोन मुले उतरल्यावर ही बस ११ व्या रस्त्यावरील एका विद्यार्थ्याला उतरवण्यासाठी थांबली असताना, त्याच वेळी हे झाड कोसळले.



विहानच्या आईला अचानक फोन


या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विहान श्रीवास्तव या ११ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विहानची आई जुही श्रीवास्तव ही घटना घडली त्यावेळी ऑफिसमध्येच होत्या. अचानक त्यांना फोन आला आणि त्यांना धक्काच बसला. आम्हीही हातातील सर्व कामे टाकून त्यांच्यासोबत रुग्णालयात धाव घेतली, असे त्यांचे सहकारी बी. बी. कर्णा यांनी सांगितले.

विहानच्या मृत्यूने शिक्षकवर्गही हळहळला


विहानच्या शिक्षिका दर्शिका मेहता यांनीही विहान खूप चांगला, हुशार आणि खेळकर मुलगा असल्याचे सांगितले. या मुलांसोबत घडलेला प्रसंग खूपच भयानक आहे. विहान चुणचुणीत मुलगा होता. शाळेत तो आमच्या खेळाच्या टीममध्येही होता. त्याच्यासोबत हे असे काही होईल, याची कल्पनाच करवत नाही, असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना शांत करुन सुटका


झाड कोसळले तेव्हा महेंद्र पाटील हे स्थानिकही जवळच होते. झाड बसच्या मधोमध कोसळले होते. त्यामुळे बसच्या मागच्या बाजूला बसलेले विद्यार्थी अडकले होते. त्यांना धक्का बसला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शांत करून मग आम्ही बसच्या खिडक्या फोडून त्यांना बाहेर काढले, असे त्यांनी सांगितले.

 

कुकरेजा रेसिडेन्सीवर शोककळा


या अपघातात मृत्यूमुखी पडलेला विहान घाटला गाव येथील कुकरेजा रेसिडेन्सी या इमारतीत बी विंगमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होता. स्थानिक आमदार तुकाराम काथे हेदेखील याच इमारतीत राहतात. घटनेबाबत कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत विहानच्या आई वडिलांना धीर देत इतर प्रक्रिया करण्यास मदत केली. त्यानंतर विहानचे पार्थिव राजावाडी रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले.

खेळकर विहानच्या निधनाने धक्का


विहानच्या इमारतीतील सर्वांना ही बातमी कळताच इमारतीवर शोककळा पसरली. दर दिवशी संध्याकाळी शाळेतून आल्यावर विहान मुलांसोबत खाली खेळायला यायचा. तो खट्याळ आणि खेळकर होता. त्याच्या अशा जाण्याने श्रीवास्तव कुटुंबीयांवर झालेला आघात अकल्पित आहे, अशी प्रतिक्रिया इमारतीतील रहिवाशांनी दिली. विहानच्या आईचे आणि वडिलांचे आई वडील दिल्लीत राहतात. या घटनेची माहिती समजताच ते चौघेही विमानाने मुंबईकडे रवाना झाल्याचे स्थानिक आमदार तुकाराम काथे यांनी सांगितले.

मित्र बालंबाल बचावला


अथर्व बरकडे हा इयत्ता आठवीतील मुलगाही याच बसमध्ये होता. मात्र त्याला कोणतीही इजा न होता तो सुखरूप त्यातून बाहेर पडला. अथर्वचे वडील अजित बरकडे यांनी याबाबत देवाचे आभार मानले, पण घडल्या घटनेचा अथर्वला प्रचंड धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. अथर्व बालंबाल बचावला असला, तरी त्याचा मित्र विहान या अपघातात दगावला आहे. आम्ही अथर्वला याबाबत काही सांगितले नाही. तो स्वत: अद्याप धक्क्यात आहे. हे समजले, तर त्याला आणखी मोठा धक्का बसेल, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4841,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2144,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: घरच्या ओढीने निघालेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला, स्कूलबसवर झाड कोसळून करुण अंत, ऑफिसमध्येच आईवर दुःखाचा डोंगर
घरच्या ओढीने निघालेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला, स्कूलबसवर झाड कोसळून करुण अंत, ऑफिसमध्येच आईवर दुःखाचा डोंगर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcm8kVCxWJJh556rrdvxNW_ykcI4xviat5ptc7ud6uk3_yMobygstEgUp-eTOuQ9l4phWECp4JAhICvz_4uNHXuFJlFLY_ZzGnJxzcylQSyHup2tpAjQ2scYe7_omcHWes9zFWFyTOsJcnWqkFfdtbmvAMTj8X_yjqXlPTv6zk_2ka7Qk3tSl3MB6u3Oc/s320/IMG_20260701_112941.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcm8kVCxWJJh556rrdvxNW_ykcI4xviat5ptc7ud6uk3_yMobygstEgUp-eTOuQ9l4phWECp4JAhICvz_4uNHXuFJlFLY_ZzGnJxzcylQSyHup2tpAjQ2scYe7_omcHWes9zFWFyTOsJcnWqkFfdtbmvAMTj8X_yjqXlPTv6zk_2ka7Qk3tSl3MB6u3Oc/s72-c/IMG_20260701_112941.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_926.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_926.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content