जुन्नर बोतार्डे:सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आज, २८ जून रोजी संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण (NID) मो...
जुन्नर बोतार्डे:सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आज, २८ जून रोजी संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण (NID) मोहिमेला जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीच्या माध्यमातून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आज सकाळपासूनच पालकांनी आपल्या चिमुरड्यांना लस देण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती.लसीकरण मोहिमेचे नियोजन:बोतर्डे परिसरातील एकही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील प्रमुख चौक, मंदिर परिसर आणि अंगणवाडी केंद्रांवर पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली होती. बालकाला पूर्वी पोलिओचे डोस दिले असले तरीही, या राष्ट्रीय मोहिमेत अतिरिक्त डोस देणे आवश्यक असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक पालकाला बूथवर येण्याचे आवाहन केले होते.उर्वरित बालकांसाठी घरोघरी मोहीम:आज बूथवर येऊ न शकलेल्या किंवा काही कारणास्तव डोस न मिळालेल्या बालकांसाठी पुढील दोन ते तीन दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत. बोतर्डे येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली असून पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.


COMMENTS