स्पर्म सिस्टर्स : डोनर वडिलांपासून वेगवेगळ्या घरात जन्मलेल्या तीन बहिणींना जेव्हा वयाच्या विशीत त्यांच्या जन्माचं सत्य समजलं | CrimeNama
Loading ...

स्पर्म सिस्टर्स : डोनर वडिलांपासून वेगवेगळ्या घरात जन्मलेल्या तीन बहिणींना जेव्हा वयाच्या विशीत त्यांच्या जन्माचं सत्य समजलं

  Sperm Sisters नताशा, जेम्मा आणि हेलन म्हणतात की त्या बहिणी आहेत हे समजल्यानंतर त्या 'अविभाज्य' आहेत नताशा, जेम्मा आणि हेलेन यांना ...

 


Sperm Sisters नताशा, जेम्मा आणि हेलन म्हणतात की त्या बहिणी आहेत हे समजल्यानंतर त्या 'अविभाज्य' आहेत

नताशा, जेम्मा आणि हेलेन यांना मोठं होत असताना त्यांचे वडील कोण आहे हे त्यांना माहित आहे असंच वाटत होमात्र अनेक दशकांनंतर डीएनए चाचण्या झाल्यानंतर ही गोष्ट समोर आली की त्या सर्वांचा जन्म वेल्शमधील एकाच स्पर्म डोनरपासून झाला होता.


त्यांचा जन्म 1991 मध्ये यासंदर्भातील नियम लागू होण्यापूर्वी झाला होता.


त्यामुळे स्पर्म डोनर्सच्या 'वाईल्ड वेस्ट' काळात (अमेरिकेत पश्चिमेकडील प्रदेशात वस्त्यांमध्ये प्रचंड वाढ होण्याचा काळ) म्हणजे नियमन नसलेल्या काळात जन्मलेल्या मुलांच्या पिढीचा त्या भाग होत्या, असं त्या म्हणाल्या.


स्पर्म सिस्टर्स


त्या स्वत:ला 'स्पर्म सिस्टर्स' असं म्हणतात.


अलीकडेच त्यांना एकमेकांच्या बहिणी असल्याचं समजल्यानंतर त्या एकमेकींना जाणून घेत एकमेकींबरोबर बहिणींचं नातं घट्ट करत आहेत.


त्या सर्व पहिल्यांदा भेटल्या त्या प्रसंगाचं वर्णन त्या म्हणाल्या की ते एखाद्या "परीकथेसारखे, खूपच जादुई होतं. आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते."


जेम्मा आणि हेलेन हिक्स या बर्कशायरमध्ये एकत्रच वाढल्या. त्यांना वाटत होतं की ज्या वडिलांनी त्यांचं संगोपन केलं, तेच त्यांचे जैविक वडील आहेत.


 Gemma Hicksहेलन आणि जेम्मा यांना त्यांच्या जन्माचं सत्य त्यांच्या वयाच्या विशीच्या उत्तरार्धात समजलं

मात्र त्यांना त्यांच्या विशीच्या उत्तरार्धात समजलं की त्यांचा जन्म एका स्पर्म डोनरचा वापर करून झाला होता. मात्र तो एकच होता का हे त्यांना माहिती नव्हतं. कारण त्यांच्या जन्माच्या वेळेस गर्भधारणा झाली तेव्हा फार थोड्या माहितीची नोंद करण्यात आली होती.


"त्यावेळेस स्पर्म डोनेशनच्या क्षेत्राचं फार कमी नियमन होतं आणि त्यावर स्पष्ट नियम नसल्यामुळं त्यावर खूप कमी नियंत्रण होतं. त्यामुळे अनेक पालकांना यातून जन्माला आलेल्या मुलांना त्यांचीच मुलं असल्याप्रमाणे त्यांचं संगोपन करण्यास सांगितलं जायचं.


तसंच ही गोष्ट त्यांच्या मुलांपासून गुप्त ठेवण्यास प्रोत्साहित केलं जायचं किंवा तसा दबाव टाकला जायचा," असं 36 वर्षांच्या जेम्मा म्हणतात. त्या सरेमध्ये राहतात.


डीएनए चाचणी आणि नवीन बहिणींचा परिचय


ऑगस्ट 1991 मध्ये ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्रियोलॉजी ऑथोरिटी (एचईएफए) या यूकेतील प्रजनन नियामक संस्थेची स्थापना केली गेली. त्यानंतर मार्गदर्शक तत्वं लागू करण्यात आली.


डीएनए चाचणीतून तेच या मुलींचे जैविक वडील असल्याची खातरजमा तर झालीच, त्याचबरोबर यामुळे त्यांचा परिचय इतर नवीन बहिणींशीदेखील झाला.


"मला शारीरिकदृष्ट्या वेगळं वाटलं. मला वाटलं की मी कोण आहे हे मला माहिती नाही. मी केलेल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीबद्दल मी शंका उपस्थित करू लागले. याचा संबंध माझ्या अनुवांशिकतेशी आहे असा प्रश्न मी विचारू लागले," असं जेम्मा म्हणाल्या.


तर 35 वर्षांच्या हेलन हॅम्पशायरमध्ये राहतात. त्यांना सुरुवातीला हे माहित झाल्यावर धक्का बसला. मात्र नंतर या बातमीमुळे त्यांना परिस्थिती लक्षात आली आणि काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत स्पष्टता आली.


 Natasha Goldstein-Opasiak

नताशा यांना त्यांच्या वयाच्या विशीपर्यंत त्या स्पर्म डोनरद्वारे जन्माला आल्याचं माहित नव्हतं

"मला अचानक एक शांततेची तीव्र भावना जाणवली. मी जेव्हा माझ्या आयुष्यातील काही टप्प्यांकडे, घटनांकडे मागे वळून पाहिलं तेव्हा मला अचानक त्या गोष्टींचं अधिक चांगलं आकलन झालं," असं हेलन म्हणाल्या.


त्यानंतर त्या एकाच स्पर्म डोनरपासून जन्मलेल्या आणखी दोन बहिणींशी जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक आहे 36 वर्षांच्या नताशा गोल्डस्टाईन-ओपासियाक. त्या एसेक्समध्ये राहतात.


त्यांना वयाच्या 21 व्या वर्षी समजलं होतं की, त्यांचा जन्म स्पर्म डोनरच्या शुक्राणूंपासून झाला आहे. मात्र वयाच्या 31 व्या वर्षापर्यंत त्यांनी डीएनए चाचणी केली नव्हती.


"मी हे केलं कारण माझा शरीराच्या अर्ध्या भागाचा जनक कोण आहे, हे मला जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता होती. मात्र मला भावंडं मिळतील याची कल्पना मी अजिबात केली नव्हती," असं त्या म्हणाल्या.


"तुम्हाला नातेवाईक आहेत, असं लिहिलेला एक ईमेल येतो. हे अगदी टिंडरसारखंच आहे. त्यात लिहिलेलं असतं की तुमची जुळणी झाली आहे. या आहेत तुमच्या सावत्र बहिणी."


'आम्ही एकमेकांकडे चुंबकासारखे खेचले गेलो'


हेलन आणि जेम्मा यांनी नताशा यांच्याशी संपर्क साधला. मग एक महिन्याच्या आत त्या भेटायला तयार झाल्या.


"आम्ही एकमेकांकडे चुंबकासारखे खेचले गेलो, असं आम्ही नेहमीच म्हणतो," असं जेम्मा म्हणाल्या.


"मला वाटतं की नॅटसोबत टेबलवर बसल्यावर मिनिटभरातच आमच्या लक्षात आलं की आम्ही एकाच पद्धतीनं बोलतो. आमची मतंदेखील सारखीच आहेत. ही खूपच विचित्र गोष्ट आहे. मात्र ती चमत्कारिक आहे," असं त्या म्हणाल्या.


त्यांच्या असंही लक्षात आलं की, यापूर्वीही त्या एकमेकींच्या अगदी जवळ आल्या होत्या.


ते 15 वर्षांपूर्वी घडलं होतं. तेव्हा जेम्मा आणि नताशा या लीड्स विद्यापीठात त्या एकाच वसतिगृहात राहत होत्या.


"लहानपणी आम्हाला एकमेकींचा सहवास लाभला नाही, ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे. तसं झालं तर आम्ही एकत्र वेळ घालवू शकलो असतो. वाढदिवसाच्या पार्ट्या एकत्र केल्या असत्या. आम्ही इतक्या गोष्टी गमावल्या, याचा विचार करून खूप दु:ख होतं," असं जेम्मा म्हणाल्या.


बहिणींचे समान गुण, स्वभाव आणि वेल्सचा वारसा


या तिघींमध्येही सर्जनशीलतेचे समान गुण आहेत. जेम्मा या कला क्षेत्रात गेल्या. तर हेलन संगीताच्या क्षेत्रात आणि नताशा नृत्याच्या. त्या तिघीही कधीतरी शिक्षिका किंवा प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.


"मी ज्या घरात वाढले तिथे सर्जनशीलतेचं विशेष असं वातावरण नव्हतं. मात्र आम्ही एका सर्जनशील पार्श्वभूमीतून म्हणजे जैविक पार्श्वभूमी आलो आहोत, हे माहिती झाल्यावर माझे काही गुण कुठून आले आहेत हे समजण्यास मला मदत झाली," असं जेम्मा म्हणाल्या.


आपला मूळ वारसा किंवा पार्श्वभूमी माहित असण्याचा आपल्या ओळखीवर कसा परिणाम होतो, याबद्दल या तिन्ही बहिणी बोलतात.


जेम्मा आणि हेलन यांचं संगोपन करणारे वडील वेल्श (यूकेतील वेल्समधील) आहेत. या दोघी लहानपणी वेल्सला जायच्या आणि तिथल्या रग्बी संघाला पाठिंबा द्यायच्या.


"आमच्या जडणघडणीत वेल्श असणं, हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता, असं मला वाटतं. आम्ही त्याबद्दलचा प्रचंड अभिमान बाळगतच मोठे झालो," असं जेम्मा म्हणाल्या.


योगायोगानं, डीएनए चाचणीतून दिसून आलं की त्यांच्या जैविक वडिलांना वेल्शचा वारसा होता.


"सुदैवानं आमच्यासाठी फार काही बदललं नाही. आम्ही फ्रेंच किंवा इतर कुठल्या पार्श्वभूमीच्या आहेत असं समजलं असतं तर काय वाटलं असतं, हे मला माहिती नाही. मात्र वेल्श समुदाय हा आमच्या व्यक्तिमत्वाचा मूळ भाग नाही, हे समजल्यावर मला खूप दु:ख झालं असतं," असं जेम्मा पुढे म्हणाल्या.


 Gemma Hicksजेम्मा आणि हेलन यांची जडणघडण होत असताना त्यांच्या स्वत:बद्दलची ओळख निर्माम होण्यामध्ये वेल्शच्या रग्बी सामन्यांचा मोठा भाग होता

नताशा स्वत:ला वेल्श आहोत असं मानत मोठ्या झाल्या नाहीत. मात्र तरीदेखील त्यांचा तिथल्या लोकांशी संबंध होताच.


नताशा म्हणतात, "मी माझ्या लहानपणी बँगोर आणि ग्विनेडसारख्या उत्तर वेल्शमधील ठिकाणी बराच वेळ घालवला होता. त्यामुळे मला वेल्सशी एक वेगळंच घट्ट नातं जाणवतं,"


"स्पर्म डोनर हे तिथलेच होते, हे माहिती झाल्यावर मला खूपच आनंद झाला."


हेलन पुढे म्हणाल्या, "जेव्हा तुम्हाला तुमची खरी ओळख माहित होते, त्याबाबतीत आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला ते समजलं, त्यातून तुमच्या मनाला खूप शांतता मिळते."


या बहिणींना त्यांचे जैविक वडील (म्हणजे ते स्पर्म डोनर) कोण आहेत हे शोधण्यात यश आलं आहे. त्यांनी त्यांच्याशी संपर्कदेखील साधला आहे. स्पर्म डोनरकडून या बहिणींना 'प्रेमळ आणि सकारात्मक' प्रतिसाद मिळाला, असं त्या सांगतात.


एचएफईएनं सांगितलं की 1991 पासून यूकेतील परवानाधारक क्लिनिकमध्ये डोनर उपचार पद्धतीद्वारे 85,000 हून अधिक लोकांचा जन्म झाला आहे.


यूकेतील कायद्यामध्ये 2005 मध्ये बदल झाल्यामुळे आता शुक्राणू, स्त्रीबीज किंवा भ्रूण यांचं निनावीपणे दान करणं शक्य नाही.


याचा अर्थ जेव्हा स्त्रीबीज, शुक्राणू किंवा भ्रूण दान करून जन्मलेलं मूल 18 वर्षांचं झाल्यावर, त्या अपत्याला त्या डोनरची ओळख पटवणारी काही माहिती जाणून घेता येते आणि त्याच्याशी संपर्क करता येऊ शकतो.


तिन्ही बहिणींचा पॉडकास्ट आणि स्पर्म डोनरचा विषय


या तिघीजणी म्हणतात की 'स्पर्म सिस्टर्स' म्हणून त्या अविभाज्य आहेत आणि त्यांनी त्याच नावाचा एक पॉडकास्ट सुरू केला आहे.


"मला वाटतं की आम्ही तिघींना खूप एकटेपणा जाणवत होता आणि त्याबद्दल बोलल्याबद्दल आम्हाला त्या भावनांना हाताळण्यास मदत होईल आणि आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकू," असं नताशा म्हणाल्या.


"हा पॉडकास्ट तयार करून आम्ही आम्हा बहिणींमधील नातं अधिक घट्ट केलं आहे."


"आम्हाला बरंच बोलायचं आहे, एकमेकींबद्दल जाणून घ्यायचं आहे. आम्ही एकत्र राहण्याची 30 वर्षे गमावली आहेत," असं जेम्मा पुढे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की या पॉडकास्टमुळे त्या हेलनच्या आणखी जवळ आल्या आहेत.


डोनर या संकल्पनेबद्दल जागरुकता निर्माण करायची आहे असं या तिघीजणी म्हणाल्या. नताशा म्हणाल्या की हा 'एक दुर्लक्षित विषय' आहे.


त्या म्हणाल्या की त्या जेव्हा लोकांना सांगतात की त्या स्पर्म डोनरद्वारे जन्माला आलेल्या आहेत, तेव्हा लोक अनेकदा "पूर्णपणे गोंधळात पडतात.आणि ते काय आहे, त्याचा अर्थ काय होतो" हे त्यांना खरोखरंच समजत नाही.


स्पर्म डोनेशनमधून जन्माला आलेल्या मुलांचा आवाज होण्याचा तिन्ही बहिणींचा प्रयत्न


आता यासंदर्भात चांगले नियम असले तरीदेखील त्या म्हणाल्या की स्पर्म डोनरद्वारे जन्माला आलेल्या सर्व आपत्यांना पुरेसं संरक्षण नाही.


 Sperm Sistersमार्चमध्ये या बहिणींनी एकमेकांच्या गोष्टी शेअर करण्यासाठी एक पॉडकास्ट सुरू केलं

या बहिणींना त्यांना आणखी किती भाऊ किंवा बहिणी आहेत याची माहिती नाही. कारण त्या जेव्हा जन्माला आल्या तेव्हा एका डोनरकडून जास्तीत जास्त 10 कुटुंबांनाच शुक्राणू दान करता येण्याची सध्याची मर्यादा अस्तित्वात नव्हती.


 ताज्या तपासणीतून समोर आलं आहे की सोशल मीडिया वेबसाईट्स आणि ॲप्समुळे कशाप्रकारे अनियंत्रित स्पर्म डोनेशनला चालना मिळते आहे.


"स्पर्म डोनेशनचं योग्यप्रकारे नियमन होईल आणि लोकांना त्यांचे डोनर कोण आहेत हे जाणून घेता येऊ शकेल याची खातरजमा करण्यासाठी एचएफईएनं खूप प्रयत्न केले आहेत," असं जेम्मा म्हणाल्या.


"कायद्यांमध्ये खूप सुधारणा झाली आहे. मात्र दुर्दैवानं 'फेसबुक स्पर्म' सारख्या गोष्टींच्या वाढत्या प्रसारामुळे ती सर्व मेहनत वाया जात असल्याचं वाटतं," असं त्या म्हणाल्या.


"आमचा जन्म अशा काळात झाला होता, जेव्हा कोणतेही नियम नव्हते. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मला वाटतं की स्पर्म डोनरद्वारे जन्माला आलेल्या पुढील पिढीचा आवाज जर आम्ही बनू शकलो, तर कदाचित त्यामुळे काही पालकांना याबाबत गुप्तता पाळण्याबाबत किंवा त्याबद्दल प्रश्न न विचारण्याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची प्रेरणा मिळेल," असं त्या म्हणाल्या.


हेलन म्हणाल्या की ज्या मुलांचा जन्म स्पर्म डोनरद्वारे झाला आहे, "अशांची बाजू मांडण्यासाठी सध्या तरी कोणताही आवाज नाही. त्यामुळं त्या तिघीं बहिणींना हा आवाज होण्याची" आशा आहे.



नताशा, जेम्मा आणि हेलन म्हणतात की त्या बहिणी आहेत हे समजल्यानंतर त्या 'अविभाज्य' आहेत नताशा, जेम्मा आणि हेलन म्हणतात की त्या बहिणी आहेत हे समजल्यानंतर त्या 'अविभाज्य' आहेत. 

COMMENTS

Name

Agriculture,99,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4846,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1776,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,969,Jalgaon,38,Jalna,22,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2147,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2070,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: स्पर्म सिस्टर्स : डोनर वडिलांपासून वेगवेगळ्या घरात जन्मलेल्या तीन बहिणींना जेव्हा वयाच्या विशीत त्यांच्या जन्माचं सत्य समजलं
स्पर्म सिस्टर्स : डोनर वडिलांपासून वेगवेगळ्या घरात जन्मलेल्या तीन बहिणींना जेव्हा वयाच्या विशीत त्यांच्या जन्माचं सत्य समजलं
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDcbdmfMUyP6SKZ6Ov5pvQLuth3kOTDhyUoFDUluXrYOKWX17AS_0phHA5aYuaxYCTMnVVAf25tyPL9Pexqr04B1xu-H2E89BhMuJcN3f6S0QF32gF5y04bq4EJrOdxVPXVfA8ka5StzUTDpEJKXOPSggnYsfL_Y__Y4FKk0Dh3jGlZKe9lkQeUUmwKpQ/s320/n716723165178194927881957507dba8d41fd02f4414bb079bdb815b7c284539c83f7df8a1b5254be309617.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDcbdmfMUyP6SKZ6Ov5pvQLuth3kOTDhyUoFDUluXrYOKWX17AS_0phHA5aYuaxYCTMnVVAf25tyPL9Pexqr04B1xu-H2E89BhMuJcN3f6S0QF32gF5y04bq4EJrOdxVPXVfA8ka5StzUTDpEJKXOPSggnYsfL_Y__Y4FKk0Dh3jGlZKe9lkQeUUmwKpQ/s72-c/n716723165178194927881957507dba8d41fd02f4414bb079bdb815b7c284539c83f7df8a1b5254be309617.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_895.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_895.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content