Crime News : उत्तर प्रदेशातील वाराणासी जिल्ह्यातील सारनाथ पोलीस ठाणे परिसरात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अकथा गावातील ...
Crime News : उत्तर प्रदेशातील वाराणासी जिल्ह्यातील सारनाथ पोलीस ठाणे परिसरात मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अकथा गावातील एका तरुणावर दीड महिन्याच्या बाळाला जमिनीवर फेकल्याचा आरोप करण्यात आला.देवानेच असे करण्यास सांगितल्याचे संबंधित तरुणाचे म्हणणे आहे. देवाला बळी हवा होता, त्यामुळे बळी दिला. या घटनेनं कुटुंबात एकच भीतीचं वातावरण पसरलं आणि मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेत प्रकरणाचा तपास करत आहेत.
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली होती. अकथा गावातील रहिवासी असलेल्या राजेश वनवासी यांचा शेजारी असलेल्या विकास यादव त्यांच्या घरी आला होता. तेव्हा घरातील एक वृद्ध व्यक्ती लहान बाळाला मांडीवर घेऊन झोपली होती. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, विकासने बाळाला दूध पाजण्यासाठी त्याला मांडीवर घेण्याची इच्छा दर्शवली.
शेजारचे मंडळी असल्याने कुटुंबाने कसलाही संशय व्यक्त केला नाही, त्यामुळे त्यांनी लहान बाळाला त्यांच्याकडे दिले. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पोलिसांना माहिती देण्यासाठी 112 वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. या दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी तरुणाला तात्काळपणे ताब्यात घेतले.
आरोपी काय म्हणाला?
पोलिसांच्या चौकशीदरम्यान, आरोपी तरुणाने सांगितलं की, 'देवनेच मला असं करण्यास सांगितलं', अशी माहिती समोर आली. पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत, त्याच्या मानसिक स्थितीचा देखील तपास सुरू आहे.


COMMENTS