'दाल में अभी भी कुछ काला है', पोलीस ठाण्यातूनच गुटखा तस्कर फरार; इंदापूर पोलिसांची मोठी नामुष्की | CrimeNama
Loading ...

'दाल में अभी भी कुछ काला है', पोलीस ठाण्यातूनच गुटखा तस्कर फरार; इंदापूर पोलिसांची मोठी नामुष्की

  पुणे/इंदापूर: जिल्ह्यात गुटखा बंदी असतानाही चढ्या दराने सुरू असलेल्या अवैध विक्रीचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इंदापूरमध्ये प्...

 


पुणे/इंदापूर: जिल्ह्यात गुटखा बंदी असतानाही चढ्या दराने सुरू असलेल्या अवैध विक्रीचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इंदापूरमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त केल्यानंतर चौकशीसाठी आणलेल्या संशयिताने थेट पोलिस ठाण्यातून पलायन केल्याने खळबळ उडाली.या प्रकारामुळे इंदापूर पोलिसांची मोठी नामुष्की झाली असून, काही तासांच्या शोधमोहीमेनंतर आरोपीला पुन्हा ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


इम्रान हुसेन शेख (वय ३८, रा. चाळीस फुटी रस्ता, बाजारतळ, इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत आणि अक्षय शेळके यांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या तपासणीत जुन्या पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका गाळ्यातून सुमारे २ लाख ४२ हजार रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला होता. त्यानंतर पुढील चौकशीसाठी इम्रान शेख याला इंदापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच तो पोलिसांच्या ताब्यातून निसटला. या घटनेची चर्चा सुरू होताच पोलिसांची धावपळ उडाली. अखेर वडगाव निंबाळकर पोलिसांनी इंदापूरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आरोपीला त्याच्या कारसह ताब्यात घेतले. सायंकाळी त्याला पुन्हा इंदापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.


पोलिस निरीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


इंदापूर पोलिस निरीक्षक विकास नाळे यांच्याशी यासंदर्भात दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला असता ते म्हणाले, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना तो बाहेर निघून गेला आहे. अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. तो आमच्या ताब्यातच आहे, असे त्यांनी सांगितले. तर सायंकाळी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी इम्रान शेख याला त्याच्या कारसह पकडले. शेख हा जर इतक्या दूरपर्यंत गेला असेल, तर पोलिस निरीक्षक नाळे यांच्या ताब्यात असणारी व्यक्ती कोण होती, हा प्रश्न उपस्थित होतो. शेखला पळून जाण्यास पोलिस ठाण्यातून कोणी मदत केली का, असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.


यापूर्वीही नजरचुकून आरोपी फरार


तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर १ जून रोजी त्या खात्याने केलेल्या कारवाईत पोलिस खात्यातील एका कर्मचाऱ्याच्या भावाकडील प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा व वाहन जप्त करण्यात आले होते. त्या प्रकरणातील आरोपी 'नजरचुकून' घटनास्थळावरून गायब झाला होता. या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील आरोपी थेट पोलिस ठाण्यातून गायब झाल्याने या प्रकारात पोलिसांचाच सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली होती. पाच तासांनी का होईना, पोलिसांनी आरोपीला पकडल्याने संशय काहीअंशी निवळल्यासारखे वाटत असले, तरी 'दाल में अभी भी कुछ काला है' असे जाणवत असल्याचे चित्र आहे.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: 'दाल में अभी भी कुछ काला है', पोलीस ठाण्यातूनच गुटखा तस्कर फरार; इंदापूर पोलिसांची मोठी नामुष्की
'दाल में अभी भी कुछ काला है', पोलीस ठाण्यातूनच गुटखा तस्कर फरार; इंदापूर पोलिसांची मोठी नामुष्की
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiz_GBBBOlvIRzbCA1mANNvLQp-cU__b7BUwLJXvDiloZsntThKFhFqANSJpNwt0YeaxtDHAq9whLzxWe5bGg1Zj7vxG5Y35vCUPwexgZRluDLfck5th2c00iDiZ7HXBGuzqAEmUaUPYCVCTkHCMa1aCx0xY09BfGLBjPHDI25Tlkf97mnV0Dw9Mr_Ar-Y/s320/n716716127178195163244386dc85dff5ad8e4d665c1125c331b8b813b9493d8e3a70bd19a133cd5e54dacb.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiz_GBBBOlvIRzbCA1mANNvLQp-cU__b7BUwLJXvDiloZsntThKFhFqANSJpNwt0YeaxtDHAq9whLzxWe5bGg1Zj7vxG5Y35vCUPwexgZRluDLfck5th2c00iDiZ7HXBGuzqAEmUaUPYCVCTkHCMa1aCx0xY09BfGLBjPHDI25Tlkf97mnV0Dw9Mr_Ar-Y/s72-c/n716716127178195163244386dc85dff5ad8e4d665c1125c331b8b813b9493d8e3a70bd19a133cd5e54dacb.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_88.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_88.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content