लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, प्रवासी घाबरले, कोणाला काही समजेना..... | CrimeNama
Loading ...

लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, प्रवासी घाबरले, कोणाला काही समजेना.....

  मुंबईतील चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये सोमवारी (दि.23) रात्री एक धक्कादायक घटना घडली. अंधेरी ते बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये झाले...

 


मुंबईतील चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये सोमवारी (दि.23) रात्री एक धक्कादायक घटना घडली. अंधेरी ते बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये झालेल्या वादातून 22 वर्षीय मयंक लोहार याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

मयंक आणि आरोपी हे दोघेही अंधेरी स्थानकातून एकाच फर्स्ट क्लास डब्यात चढले होते. मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपीने बोरिवली स्थानकातून पळ काढला


वाद वाढल्यानंतर आरोपीने मयंकच्या पोटात चाकूने वार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये घडला. गंभीर जखमी झालेल्या मयंकला मदत मिळण्यापूर्वीच आरोपीने बोरिवली स्थानकात गाडी पूर्णपणे थांबण्यापूर्वी उडी मारून पळ काढला.


प्रशासन मदतीसाठी धावले, पण तरुणाला मृत्यूने गाठले


रात्री 11.04 वाजता लोकल बोरिवली स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी मयंकला डब्यातून बाहेर काढून उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आला.

या प्रकरणाचा तपास सरकारी रेल्वे पोलीस करत आहेत. पश्चिम रेल्वेने सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणांकडे सुपूर्द केले आहेत. तसेच तपासासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4841,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2144,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, प्रवासी घाबरले, कोणाला काही समजेना.....
लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, प्रवासी घाबरले, कोणाला काही समजेना.....
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivwM_Nark-lU3_fSJKOnVdaVOrfR_rt5HemZgbiAEJ7YoO-xA16f2FW-GrGTgZX5Royiio0ZlkZYBglWAhB6IMb4dY5N1odcbIDpC8-I9YgOAHSvIIei_1xeq3LURGnIxz0NleFCVOZHCbo9wPsSi30iuba2PgIAQiHY8TKfaOOJcUc9wY6dsMEeSC3MU/s320/1002373411.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivwM_Nark-lU3_fSJKOnVdaVOrfR_rt5HemZgbiAEJ7YoO-xA16f2FW-GrGTgZX5Royiio0ZlkZYBglWAhB6IMb4dY5N1odcbIDpC8-I9YgOAHSvIIei_1xeq3LURGnIxz0NleFCVOZHCbo9wPsSi30iuba2PgIAQiHY8TKfaOOJcUc9wY6dsMEeSC3MU/s72-c/1002373411.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_860.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_860.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content