मागील वर्षी २५ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या इतवारा परिसरात एक ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली होती. ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला हो...
मागील वर्षी २५ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या इतवारा परिसरात एक ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली होती. ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून १९ वर्षीय सक्षम ताटेची निर्घृण हत्या करण्यात आली होती.मुलीचे वडील आणि भावांनी घरी बोलवून सक्षमला तीन गोळ्या घातल्या. तसेच त्याचं डोकं दगडाने ठेचलं होतं. विशेष म्हणजे आरोपींनी लग्नाची बोलणी करायचं असल्याचं सांगून घरी बोलवलं होतं. घरी जावयाप्रमाणे स्वागतही केलं. चहाही पाजला. यानंतर खून केला.
सक्षमच्या हत्येनंतर त्याची प्रेयसी आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं होतं. माझ्या बापाने आणि भावाने सक्षमला मारलं. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही आंचलने केली होती. शिवाय सक्षम गेला असला तरी मी आता तुमच्या घरी सून बनून राहणार, असंही आंचलने सांगितलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आंचल सक्षमचं घर सोडून निघून गेली आहे. शिवाय तिने सक्षमच्या भावावर गंभीर आरोपही केले आहेत.
खरं तर, काही दिवसांपूर्वी सक्षमच्या आईने आंचल घरातून निघून गेली. आजी आजारी असल्याचं सांगून ती गेली आणि परत आलीच नाही, असा दावा सक्षमच्या आईनं केला होता. तसेच सक्षमची हत्या आणि त्यानंतर आंचल घरातून निघून गेल्याने धसका बसून सक्षमच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला, असा दावा सक्षमच्या आईनं केला होता. मात्र आता आंचलने सक्षमच्या आईचे सगळे दावे खोडून काढले आहेत. सक्षमच्या घरात होणाऱ्या त्रासाबद्दल तिने माहिती दिली.
आंचलने दीरावर काय आरोप केले?
सक्षमच्या आईने केलेल्या दाव्याबाबत प्रतिक्रिया देताना आंचल म्हणाली, "मी एकदम प्रामाणिकपणाने त्यांच्या घरी गेले होते. मी त्यांना वचनही दिलं होतं. की शेवटपर्यंत सक्षमच्या घरी राहणार, आम्ही आमचा संसार करणार, पण सक्षमचा भाऊ माझ्यासोबत बरोबर वागत नव्हता. त्याचे माझ्याबाबत एकदम बॅड इंटेन्शन होते. तो मला वाईटरित्या टच करायचा. याबाबत मी त्याच्या घरी सांगितलं, त्याच्या मम्मीला, आजीला, अंकलला वगैरे... पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं."
"एवढं सांगून जरी त्यांना माझ्यावर विश्वास बसत नव्हता, तर पुढे चालून जर काही वाईट झालं, तरी ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. याच कारणाने मी माझ्या घरी निघून आली आहे. पण त्या बोलतायत की मी त्यांच्या घरून पळून आलीये. माझ्या आजीच्या तब्येतीचा बहाणा करून आलीये. तर असं काहीच नाहीये. सक्षमचा भाऊ मला त्रास देत होता. माझ्यासोबत वाईट वागत होता, म्हणून मी घरी आले, हे एसपी सरांना सुद्धा माहीत आहे. ॲडिशनल एसपी अर्चना पाटील मॅडमना सुद्धा हे माहिती आहे. पोलिसांनीच मला माझ्या घरीच आणलं आणि माझ्या आजीच्या हवाली केलं. सक्षमच्या फॅमिलीचं असं म्हणणं आहे की मी माझ्या काकांच्या दबावाखाली येऊन किंवा काकांच्या संपर्कात होते, म्हणून मी माझ्या घरी परतले. पण असं काहीच नाहीये. मी सज्ञान आहे, मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. मला तिथे त्रास असल्यामुळे मी माझ्या घरी आले.


COMMENTS