केडगाव: जि. पुणे: केडगाव ( ता दौंड ) येथील बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरण राज्यभर गाजत असताना आज यवत पोलीस स्टेशनमध्ये दोन डॉक्टर...
केडगाव: जि. पुणे: केडगाव ( ता दौंड ) येथील बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरण राज्यभर गाजत असताना आज यवत पोलीस स्टेशनमध्ये दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी दिली.वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गुजर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार डॉक्टर स्वाती लवंगारे ( रा.केडगाव ) व डॉक्टर तुकाराम मोटे ( रा. उरुळी कांचन ) यांच्यावर आज यवत पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या महिलांना दिल्याच्या आरोप खाली गुन्हा दाखल झाला आहे. डॉ.स्वाती हिचे केडगाव येथे लवंगारे मॅटरनिटी होम या नावाचे हॉस्पिटल आहे तर मोटे याचे उरुळी कांचन येथे माहेर नावाचे हॉस्पिटल आहे.
गर्भपात प्रकरनाची व्याप्ती खूप मोठी असल्याने या प्रकरणांमध्ये आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी लक्ष घातले आहे याशिवाय विधान परिषदेच्या उपसभापती निर्मला गोऱ्हे यांनी यासंदर्भात संबंधितांना मोका लावण्या संदर्भात नुकतेच वक्तव्य केले आहे त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे यवत पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा याआधी तपास केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी हा तपास दोनच दिवसापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिलेला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक नागनाथ एम्पल्ले यांच्या आदेशानुसार गेली दोन दिवस दौंड तालुक्यातील विविध हॉस्पिटलची तपासणी आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने केली आहे. या तपासात लवंगारे हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या पथकाला आढळून आल्या. गर्भपाताच्या गोळ्या देण्याचा अधिकार नसताना डॉक्टर लवंगरे व डॉक्टर मोटे यांनी बेकायदेशीरपणे या गोळ्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
केडगाव येथील गर्भलिंग निदान रॅकेट 20 मे रोजी उघडकिस आलं होतं. तेव्हापासून या प्रकरणांमध्ये तीन डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता आज मोटे व लवंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. डॉक्टर मोटे यास पोलिसांनी आज अटक केली आहे. या प्रकरणात या आधी यवत पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेले डॉ.मंदार माळी ( रा. किकवी ता.भोर ) व सुंदरम कदम ( रा. उरळी कांचन ) हे दोघे डॉक्टर फरार आहेत.


COMMENTS