संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील सिल्क मिल कॉलनी परिसरात मालमत्तेच्या वादातून एका मुलाने आपल्या ज...
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील सिल्क मिल कॉलनी परिसरात मालमत्तेच्या वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पटेल जफर करीमोद्दीन असे मृत पित्याचे नाव असून, या हल्ल्यात त्यांची मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी मुलाला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
मालमत्तेवरुन वडिलांशी वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पटेल जफर करीमोद्दीन आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहमान अब्दुल जफर यांच्यात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून मालमत्तेवरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते, जिथे निकाल जफर यांच्या बाजूने लागला. न्यायालयाच्या आदेशानुसार, तहसील प्रशासन आणि पोलिसांच्या उपस्थितीत वादातील भूखंडाचा ताबा जफर यांना देण्यात आला होता. आपल्या विरोधात निकाल गेल्याचा राग आरोपी अब्दुल रहमान अब्दुल जफरच्या मनात होचाकूने केले सपासप वार केले.
घटनेच्या दिवशी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास जफर करीमोद्दीन हे आपल्या मुलीसोबत भूखंडाचा ताबा घेऊन घरी परतत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अब्दुलने त्यांचा पाठलाग करून त्यांची गाडी अडवली आणि चाकूने सपासप वार केले. वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या बहिणीवरही त्याने निर्घृण हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान जफर यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


COMMENTS