मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून खंडित झालेला विद्युतपुरवठा पुन्हा सुरू झाला म्हणून आनंदात आईसह लोखंडी शिडीने पोट माळ्यावरील घरात जात असताना...
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून खंडित झालेला विद्युतपुरवठा पुन्हा सुरू झाला म्हणून आनंदात आईसह लोखंडी शिडीने पोट माळ्यावरील घरात जात असताना
चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी वडाळा येथील शांतीनगर वस्तीत घडली. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
रेहाना सद्दाम हुसेन खान (वय दोन वर्षे १० महिने) असे मृत मुलीचे नाव आहे. ती आई-वडिलांसोबत मदिना मशिदीजवळील चाळीत पोट माळ्यावर राहण्यास होती. गेल्या दोन दिवसांपासून परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास प्रवाह सुरू झाला.
लोखंडी शिडी चढताना घटना
वीज आल्याने ती आईसोबत लोखंडी शिडी चढत पोट माळ्यावर जात होती. तेव्हा विजेचा धक्का बसून रेहाना बेशुद्ध पडली. तिला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. लोखंडी शिडीतून वीज कशी प्रवाहित झाली, याबाबत तपास सुरू असल्याचे वडाळा टी. टी. पोलिसांनी सांगितले.


COMMENTS