बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून एक मन सुन्न करणारी आणि सामाजिक व्यवस्थेला हादरवून टाकणारी धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या ऑनलाइन नों...
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून एक मन सुन्न करणारी आणि सामाजिक व्यवस्थेला हादरवून टाकणारी धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या ऑनलाइन नोंदणीतून समोर आली आहे.तालुक्यात तब्बल २२ अल्पवयीन मुली गरोदर असल्याचे उघड झाले असून, यापैकी तीन माता तर अवघ्या १५ वर्षांखालील आहेत. (Child Marriage)
या संवेदनशील प्रकारामुळे बालविवाह प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाच्या नियमित ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या २२ मातांपैकी १६ माता प्रत्यक्षात पाटोदा तालुक्यातील असून, उर्वरित इतर तालुक्यातील असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी स्पष्ट केले आहे. (Child Marriage)
या प्रकरणाची जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, गटविकास अधिकारी उद्धव सानप यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, पंचायत आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. या प्रकरणात पीडित मुलींचे वय, विवाहाची परिस्थिती आणि पुराव्यांची तपासणी करून संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक अडचणी, स्थलांतर आणि सामाजिक दबावामुळे छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. (Child Marriage)
📰 न्यूज आणि विशेष


COMMENTS