१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड ! | CrimeNama
Loading ...

१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !

  सोलापूर - येथील 'शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे'त ('आयटीआय'मध्ये) 'कॉर्पोरेट जिहाद'चा धक्कादायक प्रकार उघड...

 


सोलापूर - येथील 'शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे'त ('आयटीआय'मध्ये) 'कॉर्पोरेट जिहाद'चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेतील १५० विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ झाल्याचे समोर आले आहे.या संदर्भात कर्मचार्‍यांनी २७ मार्च २०२६ या दिवशी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनानुसार आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली असून या समितीच्या पथकाने नुकतीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाला भेट दिली.


संस्थेतील मुसलमान गटनिर्देशक रमेजा कंपली हिने रुखसार शेख नामक महिलेची नियमबाह्य पद्धतीने तासिका तत्त्वावर नियुक्ती केली. ही रुक्सार शेख विद्यार्थिनींना 'प्रेम करा, पालकांनी विवाहाला अनुमती दिली नाही, तर स्वतःचे हात कापून घ्या', अशी अत्यंत विकृत आणि प्रक्षोभक शिकवण देत होती. विद्यार्थिनींनी स्वतः माध्यमांसमोर रडत याविषयी साक्ष दिली आहे की, महाविद्यालयात प्रेमाचे धडे दिले जात होते. याव्यतिरिक्त रमेजा हिने हिंदु विद्यार्थिनींची नावे वेगवेगळ्या मुलांसमवेत जोडून त्यांची अपकिर्ती केली. हिंदु विद्यार्थिनींची नावे ज्यांच्याशी जोडण्यात आली होती, ते बहुतांश मुसलमान असल्याचा आरोप आहे.


या संदर्भात 'सकल हिंदु समाजा'ने उच्चस्तरीय मुख्य कार्यालयीन चौकशी समितीच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे.


संस्थेत अत्यंत विषारी धार्मिक वातावरण निर्माण केले गेले. 'पार्लर ट्रेड'च्या (एक व्यावसायिक अभ्यासक्रम) एका विद्यार्थिनीला ताप आला म्हणून सुटी हवी होती. तेव्हा तिला तिच्या कुंकू लावण्यावरून 'तू कुंकू लावतेस, तू आजारी असू शकत नाही', अशी हिंदु धर्मविरोधी आणि अपमानास्पद टिपणी रमेजा यांनी केली. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना स्वच्छतागृहाचा वापर करता येऊ नये, यासाठी 'पाणी अल्प प्या', असा अमानवीय सल्ला दिला जात होता. रमेजा मुसलमान विद्यार्थिनींना हिंदु शिक्षकांविरुद्ध भडकवत होत्या. (मुसलमान शिक्षकांचे खरे स्वरूप ! मुसलमान कोणत्याही पदावर असला, तरी तो स्वत:ची हिंदूविरोधी प्रवृत्ती सोडत नाही, हेच यावरून दिसते ! - संपादक)


 


१. हिंदु कर्मचार्‍यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन पदावरून काढण्यात आले आणि त्यांच्या जागी कोणत्याही विज्ञापनाविना किंवा अनुभवाविना मुसलमान समुदायाच्या व्यक्तींची अवैध भरती करण्यात आली.


२. कायमस्वरूपी कर्मचारी श्रीमती स्वाती पुकाळे यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन हाकलून लावले. 'टी.डब्लू.पी.टी.' (टेक्सटाइॅल वेट प्रोसेसिंग टेक्निशिअन - एक व्यावसायिक अभ्यासक्रम) या शाखेचे पद रिक्त होताच विज्ञापन न देता अनुभव नसतांनाही श्रीमती नाहिद शेख यांची भरती केली गेली. 'फ्रूट अँड व्हेजिटेबल ट्रेड'चा अनुभव नसतांना अलमास शेख यांची भरती केली गेली.


३. तासिका कर्मचारी तमन्ना शेख या ५ महिने कामावर अनुपस्थित असूनही तिथे हिंदु व्यक्तीची नेमणूक होऊ नये; म्हणून ५ महिने मुलींना त्यांच्याकडील विषय शिकवलाच नाही आणि नंतर तिथेही मुसलमान व्यक्तीचीच भरती केली गेली.


४. प्रवेश प्रमुख असल्याचा अपलाभ घेत रमेजा नावाच्या शिक्षिका हिंदु मुलींना प्रवेशाची पूर्ण माहिती देत नाहीत, तर मुसलमान मुलींना प्राधान्य देऊन आरीफ शेख यांच्या वर्गात त्यांना वेगळे बसवून शिकवले जाते.


५. कर्मचार्‍यांच्या देयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी श्रीमती रमेजा यांच्याकडून प्रत्येक महिन्याला १ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली जाते.


६. शासनाकडून प्रात्यक्षिक करण्यासाठी कच्चा माल विनामूल्य मिळत असतांनाही रमेजा आणि इतर मुसलमान कर्मचारी विद्यार्थिनींना बलपूर्वक आणि बाजारभावापेक्षा अधिक दराने गणवेश कापड आणि कपडे सिद्ध करण्याचे साहित्य घेण्याची सक्ती करत.


७. स्वच्छता कर्मचारी अर्चना जाधव यांना काढून जाकिर सुलेमान यांना भरती केले. विरोधामुळे अर्चना जाधव यांना पुन्हा घेतले असले, तरी आता त्यांना भयंकर मानसिक त्रास दिला जात आहे.


८. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने महिला महाविद्यालये आणि शाळा यांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी केवळ महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचा कठोर आदेश दिला आहे. असे असतांना श्रीमती रमेजा यांनी हिंदु महिला स्वच्छता कर्मचार्‍याला कामावरून काढून एका मुसलमान पुरुषाची मुलींच्या संस्थेत स्वच्छता कामगार म्हणून नेमणूक केली. ही गोष्ट विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि प्रशासकीय हलगर्जीपणाची आहे.


९. श्रीमती रमेजा प्रत्येक महिन्याला ४ दिवस शैक्षणिक कामकाज बंद ठेवून १५० विद्यार्थिनींकडून झाडणे, पुसणे आणि झुडपे तोडणे अशी कष्टाची कामे बलपूर्वक करून घेत होत्या. यात अनेक मुलींना इजा होणे, चक्कर येणे असे प्रकार घडले आहेत. एखादी मुलगी विरोधात बोलली, तर तिचा घरापर्यंत पाठलाग करून धमक्या दिल्या गेल्या.


१०. तत्कालीन प्राचार्य श्री. अमर जाधव यांनी या अवैध कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला असता रमेजा यांच्या पतीने त्यांना जिवे मारण्याची आणि अंगावर ट्रक घालण्याची धमकी दिली अन् त्यांना संस्थेतून हाकलून लावले. सध्या ज्या मुलींनी आवाज उठवला आहे, त्यांच्याविरुद्धही गुन्हे नोंदवण्याच्या धमक्या देऊन दबाव आणला जात आहे.


मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ९ पेक्षा अधिक अभ्यासक्रम व्यवस्थित चालू आहेत. सौंदर्यवर्धन आणि शिवणकाम विभागाच्या २ महिला कर्मचार्‍यांमधील अंगर्तत मतभेदांमुळे संस्थेची अपकीर्ती होत आहे. इतर विभागांतील विद्यार्थिनींच्या तक्रारी नाहीत; मात्र दोन विभागांतच तक्रारी आहेत.


या संदर्भात चौकशी करण्यासाठी पुणे उपसंचालक अनिल जाधव यांच्या विशेष पथकाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १९ जून या दिवशी चौकशी केली. या प्रकरणी 'सनातन प्रभात'च्या वार्ताहरांनी अधिक माहिती घेण्यासाठी उपसंचालक अनिल जाधव यांना भ्रमणभाष केला असता त्यांनी भ्रमणभाष उचलला नाही.


COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4835,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1771,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,963,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2142,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: १५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
१५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh96fd0wednIJ7moUVxX9yFqd03tDq1vdgs22db8rBFhpoqgww-Z_QdK2sUWmJTwnca4nxIc5SGvfZP5Wo9ULti0FyzNKzk9nSry-4f2dRU3OJvhXlSJCt3scYxhrI4B7CiSsU5UblPZRzocPcN5ubTnLdBBEn4i_x_BM2jc-CZ6wEDIMJAXx_e_YklJIw/s320/n7166723841781969975642c3146002c1b5398faf21743d65728d8f5bd7960cecbcfb0bdf372efd380e0da0.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh96fd0wednIJ7moUVxX9yFqd03tDq1vdgs22db8rBFhpoqgww-Z_QdK2sUWmJTwnca4nxIc5SGvfZP5Wo9ULti0FyzNKzk9nSry-4f2dRU3OJvhXlSJCt3scYxhrI4B7CiSsU5UblPZRzocPcN5ubTnLdBBEn4i_x_BM2jc-CZ6wEDIMJAXx_e_YklJIw/s72-c/n7166723841781969975642c3146002c1b5398faf21743d65728d8f5bd7960cecbcfb0bdf372efd380e0da0.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_758.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_758.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content