पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात दुपारी भीषण अपघात घडला. या अपघातात एका लहान चिमुरडीसह दोन जणांचा ज...
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात दुपारी भीषण अपघात घडला. या अपघातात एका लहान चिमुरडीसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
हा धक्कादायक प्रकार 21 जून 2026 रोजी रविवारी घडला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, ओतूरवरून नगरच्या दिशेने येणाऱ्या एका आयशरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चुरा झाला. दुचाकी ही कल्याणच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. दोन्ही वाहन समोरासमोर आले आणि वेग नियंत्रणात न आल्याने आयशरची दुचाकीला धडक लागली, या अपघातामुळे परिसर पूरता हादरून गेला आहे.
चिमुरड्यासह दोघांचा जागीच दुर्दैवीअंत
या भीषण अपघातात चिमुरड्यासह दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली आणि मोठी खळबळ उडाली. वाहनांचा वेग आणि अचानक झालेल्या या अपघाताची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्रकरणाचा पोलिसांनी पंचनामा देखील केला.
घटनास्थळी घडलेल्या परिसरातील घटना सीसीटीव्हीतील कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. संबंधित प्रकरणाचा पोलिसांनी पुढील शोध घेण्यास सुरूवात केली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.


COMMENTS