एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षिकेने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरुन पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे...
एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षिकेने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरुन पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. मनीष गुप्ता असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, तो आधी किराणा बाजारात दलाल म्हणून काम करायचा.5 जून रोजी मनीषने त्याची पत्नी निहारिका गुप्ता हिला फोनवर तिच्या प्रियकराशी बोलताना रंगेहात पकडले होते. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान निहारिकाने घरात असलेल्या चाकूने मनीषवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत मनीष गंभीर जखमी झाला होता. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे.
'आजच नवऱ्याचा गेम करुन टाक'
या घटनेनंतर मनीषला अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तब्बल 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिर्यादी आणि मनीषच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, घटनेच्या वेळी निहारिका ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत होती, त्यानेच तिला "आजच तुझ्या नवऱ्याचा गेम करून टाक," अशी चिथावणी दिली होती, ज्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
मनीषचे वडील रामकिशोर गुप्ता यांनी अत्यंत सुन्न करणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, मनीष आणि निहारिकाचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाने संमती देऊन 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह लावून दिला होता. निहारिका ही शिक्षिका आहे. या दोघांना रियांश नावाचा सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे आणि एका क्षणाच्या रागामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाला असून, 6 वर्षांचा चिमुरडा आता पोरका झाला आहे.


COMMENTS