सलून चालकाच्या प्रेमात वेडी झाली नर्स, शेवटी सडलेला मृतदेह आढळला, काय घडलं? | CrimeNama
Loading ...

सलून चालकाच्या प्रेमात वेडी झाली नर्स, शेवटी सडलेला मृतदेह आढळला, काय घडलं?

 Crime News : प्रेमप्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेमसंबंधाचा अत्यंत क्रूरपणे अंत झाला. मु...



 Crime News : प्रेमप्रकरणाशी संबंधित एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेमसंबंधाचा अत्यंत क्रूरपणे अंत झाला. मुंबईत राहणाऱ्या 35 वर्षीय सना नावाच्या घटस्फोटित नर्सने ज्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच प्रियकराने तिचा विश्वासघात करत तिचा जीव घेतला.लग्नाची शेकडो किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातील बिजनौरला पोहोचलेल्या सनाला कदाचित याची पुसटशीही कल्पना नव्हती की, ज्या व्यक्तीवर तिने जीवापाड प्रेम केले, तोच तिचा मारेकरी बनेल. हे संपूर्ण प्रकरण बिजनौरच्या मंडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.


मैत्री, प्रेम अन् धोका


पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बिजनौरच्या सैफपूर खादर गावातील फैसल अन्सारी उर्फ शमी उर्फ समीर हा मुंबईतील एका सलूनमध्ये काम करत होता. तिथेच त्याची ओळख मुंबईच्या ओशिवरा भागात राहणाऱ्या सना नावाच्या नर्सशी झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. सना या नात्याबाबत अत्यंत गंभीर होती आणि तिने फैसलसोबत नवीन संसार थाटण्याच्या आशेने आपल्या पतीपासून घटस्फोटही घेतला होता. मात्र, काही काळानंतर फैसलच्या मनात खोट निर्माण झाली आणि तो लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. दुसरीकडे, सना मात्र या नात्याला अधिकृत नाव देण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी ठाम होती.

मुंबई ते बिजनौर


ईदच्या सुट्ट्यांसाठी फैसल मुंबईहून बिजनौरमधील आपल्या गावी आला होता. याच दरम्यान, 29 मे रोजी सना देखील लग्नाबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी बिजनौरला पोहोचली. तिथे पोहोचल्यावर तिने फैसलवर लग्न करण्यासाठी आणि सोबत राहण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली, जी गोष्ट फैसलला अजिबात आवडली नाही. यावरून झालेल्या वादातून फैसलने सनाला आपल्या दुचाकीवर बसवले आणि एका जंगलात घेऊन गेला. तिथे एका उसाच्या शेतात त्याने सनाचा गळा आवळून निर्घृण खून केला आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह शेतातच जमिनीत गाडून टाकला. या भयंकर गुन्ह्यानंतर तो अत्यंत सामान्यपणे पुन्हा मुंबईला परतला आणि आपल्या कामात व्यस्त झाली.

असं' बाहेर आलं प्रकरण


दरम्यान, सनाच्या कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी शोध सुरू केला आणि 2 जून रोजी मुंबईत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असता सनाचे शेवटचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स फैसलकडे बोट दाखवत होते. संशय बळावल्याने पोलिसांनी फैसलला ताब्यात घेऊन कडक चौकशी केली, तेव्हा त्याने सनाच्या हत्येची कबुली दिली. यानंतर मुंबई पोलीस आरोपीला घेऊन बिजनौरला पोहोचले. मंडावर पोलिसांच्या मदतीने आरोपीने दाखवलेल्या उसाच्या शेतात खोदकाम करण्यात आले, जिथे सनाचा सुमारे 15 दिवस जुना आणि सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4841,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2144,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: सलून चालकाच्या प्रेमात वेडी झाली नर्स, शेवटी सडलेला मृतदेह आढळला, काय घडलं?
सलून चालकाच्या प्रेमात वेडी झाली नर्स, शेवटी सडलेला मृतदेह आढळला, काय घडलं?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhYK6GNaZ_SouzfFFrR6aZD-YEbpR_TS0xekKrO3jK5a6YTU1KTrzdAPhF_RYUuvcjMa8TqakqAHGdicwOm1FHDwrgKOkBDQHukZ4-kfpLCAKRncrQTe3jMo47xrbmEAx1rjDrfRrzp5-o4zdwQafXl8DKvY9APnvBq_m5aJn9W45TcJtg-j-Iyx6bjp5Y/s320/n71587973517813438266514318c8902b60f1e8c5e315e624468b49cd00f734a757112fcc7b9841dc2aac24.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhYK6GNaZ_SouzfFFrR6aZD-YEbpR_TS0xekKrO3jK5a6YTU1KTrzdAPhF_RYUuvcjMa8TqakqAHGdicwOm1FHDwrgKOkBDQHukZ4-kfpLCAKRncrQTe3jMo47xrbmEAx1rjDrfRrzp5-o4zdwQafXl8DKvY9APnvBq_m5aJn9W45TcJtg-j-Iyx6bjp5Y/s72-c/n71587973517813438266514318c8902b60f1e8c5e315e624468b49cd00f734a757112fcc7b9841dc2aac24.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_745.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_745.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content