बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अखेर अंतिम निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 ...
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा अखेर अंतिम निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
16 जून रोजीच या खटल्याचा निकाल जाहीर होणार होता, मात्र काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. अखेर आज न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केले.
न्यायालयाने निकाल सुनावताना स्पष्ट केले की, सरकारी पक्ष (Prosecution) आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. केवळ सरकारी पक्षाच्या दाव्याच्या आधारे आपण आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. या प्रकरणातील घटनाक्रम आणि परिस्थितीची साखळी (Chain of circumstances) कोर्टात सिद्ध होऊ शकलेली नाही, असे न्यायालयाने नमूद केले.


COMMENTS