आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का?.. राज ठाकरे यांचा पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन मुनींना सज्जड दम | CrimeNama
Loading ...

आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का?.. राज ठाकरे यांचा पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन मुनींना सज्जड दम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच मनसे मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी मुंबईत जैन लोकांनी ठिकठिकाणी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर प...



मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच मनसे मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी मुंबईत जैन लोकांनी ठिकठिकाणी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट कसले पांढरे पट्टे मारताय?

कशासाठी मारताय? कुठून आलंय हे नवीन? अरे यांचे मुनी रस्त्यावर फिरत असतात, हायवेवर फिरत असतात. सगळीकडे जात असतात तेव्हा नाही लागत तुम्हाला पांढरे पट्टे ? असा थेट सवाल केला आहे.


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


राज ठाकरे म्हणाले, महाराजांच्या जिरोटोपावर जैनांचा झेंडा. इतपर्यंत गेलं की मग सगळच. तुम्हाला महाराजांचा जिरोटोप कळेनासा झाला? पण या सगळ्या गोष्टी जाणून बुजून सुरु आहेत का? त्या निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचे काम सुरु आहे का? हेपण तुम्हीच तपासणे गरजेचे आहे. आज वर्षानुवर्षे अनेक जैन लोक इथे राहतायेत. प्रत्येक धर्माविषयी मला आदर आहे. त्यांचे मूनी जे उत्तम काम करत असतील त्याही बद्दल आदर आहे. पण काही जणं जे आहेत त्यांच्यामधले काही मूनी हे भारतीय जनता पक्षाच्या गच्छपी लागले आहेत आणि गच्छपी लागून ते तिथे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकवून ठेवता येईल. तो एकजण कोणी तरी आहे त्याला मूनीपण म्हणत नाहीत. त्याची कुरळ्या केसाची दाढी वैगरे घेऊन फिरतो. त्याचं उलटं झालाय की काय…आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या. मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी?

“नको त्या भानगडीत कशाला येताय?”


पुढे राज ठाकरे म्हणाले, आम्हाला कोणतेही वाद नको आहेत, भांडणं नको आहेत परंतु वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्तावर येऊन उभे राहू. मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत. तेव्हा मी त्यांच्याशी बोलेनच. कसले पांढरे पट्टे मारताय? कशासाठी मारताय? कुठून आलंय हे नवीन? अरे यांचे मुनी रस्त्यावर फिरत असतात, हायवेवर फिरत असतात. सगळीकडे जात असतात तेव्हा नाही लागत तुम्हाला पांढरे पट्टे ? सोसायट्यांमध्ये सांगताय.. अस्तित्व दाखवताय? तुम्ही धर्माचं काम करा. तुम्ही त्या जैन समजाबद्दल जे काही करत असाल करा कारण आमचा तो काहीच प्रश्न नाहीये. नको त्या भानगडीत कशाला येताय? मध्यंतरी तो कबूतराचा विषय काढला होता आता हा पांढऱ्य़ा पट्ट्यांचा विषय आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायेत. सगळा जैन समाज असा नाहीये. पण हे जाणून बुजून करताय. मला हे सांगयचं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही उतरता.


राज ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की, आज अभिजीत यांनी येऊन तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती दिली. आजचा मेळावा मी खास करुन त्यासाठीच बोलावला आहे की एसआयआर या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका. एसआयआर तर येतच आहेत त्याच्यामधून बिहार पश्चिम बंगालमध्ये काय झालं आपण पाहिलंच त्याच्या आगोदर आपल्यापैकी अनेकांचं आणि आपल्याकडे असलेल्या इतर राजकीय पक्षांच्या इतरांचं या मतदार याद्यांवर लक्ष नसल्यामुळे काय काय होऊ शकतं आणि आता निवडणुका या इतक्या प्रोफेशनल लेवला आली आहे की यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे, खासदार व्हायचं आहे, मला नगरसेवक व्हायचं आहे पण आपल्या ह्या असल्या चुकीमुळे आपल्या आयु्ष्यातली पाच-पाच वर्ष घालवत आहेत. याचा काही आपल्याला अंदाज येतोय का? आज 20 वर्षापूर्वी ज्यावेळी तुम्ही सगळे सहकारी माझ्याबरोबर आलात त्यावेळी तुमची मुलं किती वर्षांची होती आणि आज ती किती वर्षांची आहेत, यातून अंदाज घ्या की आपण काय काय गोष्टी तुम्ही आंदोलना करता.. उत्तम आंदोलनं करतं.. हे सगळं करत असताना निवडणुकांचे ज्या प्रकारे समीकरण बांधलं जात आहे देशभरात त्याचा विचार तुम्ही निश्चित करणे गरजेचे आहे. नाही तर आपण फक्त आंदोलनं करत राहू आपण.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का?.. राज ठाकरे यांचा पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन मुनींना सज्जड दम
आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का?.. राज ठाकरे यांचा पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन मुनींना सज्जड दम
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhz56hmA2ojyLN7lt-6MUf2ehmPXMZzIMmaVjKMVRF1YcPpGpjOpFolsVPD9ahc-c__K0r7d2Ik4VzT89QSPFjEpPQRTYsLw_9so_xeI_hdn4pmahX4XKU_stA5nvm717KdbfcXefA2JmTp0UDd3m8Go0J-vAyEpEOcaazqf_50r4tY-3ya7uyU5lKzqOE/s320/1002358068.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhz56hmA2ojyLN7lt-6MUf2ehmPXMZzIMmaVjKMVRF1YcPpGpjOpFolsVPD9ahc-c__K0r7d2Ik4VzT89QSPFjEpPQRTYsLw_9so_xeI_hdn4pmahX4XKU_stA5nvm717KdbfcXefA2JmTp0UDd3m8Go0J-vAyEpEOcaazqf_50r4tY-3ya7uyU5lKzqOE/s72-c/1002358068.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_731.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_731.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content