एकासोबत लिव्ह-इन रिलेशन, दुसऱ्यासोबत लग्न आणि फिस्कटलेला बिअर बिझनेस.. पुण्यातील न ऐकलेली क्राईम स्टोरी | CrimeNama
Loading ...

एकासोबत लिव्ह-इन रिलेशन, दुसऱ्यासोबत लग्न आणि फिस्कटलेला बिअर बिझनेस.. पुण्यातील न ऐकलेली क्राईम स्टोरी

  सुरुवातीला स्टोरी थोडी किचकट वाटेल, पण एकदा मी ही एफआयआर वाचायला सुरुवात केली की तुमच्या डोक्यामध्ये नाव, घटनाक्रम आणि प्रसंग या तिन्ही गो...

 


सुरुवातीला स्टोरी थोडी किचकट वाटेल, पण एकदा मी ही एफआयआर वाचायला सुरुवात केली की तुमच्या डोक्यामध्ये नाव, घटनाक्रम आणि प्रसंग या तिन्ही गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. थेट गोष्टीला सुरुवात करू.पुण्यातील न ऐकलेली थरारक कहाणी


त्याचं कारण असं आहे की जळगावहून पुण्यामध्ये राहायला आलेली एक महिला प्रेमात पडते. त्यानंतर ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागते. नंतर त्या दोघांचं ब्रेकअप होतं. त्यानंतर ती आणखी एका व्यक्तीशी लग्न करते. त्याच्यासोबत घटस्फोट होतो आणि मग आधीचा जो बॉयफ्रेंड असतो, लिव्ह-इनमधला, ते दोघं पुन्हा एकदा संपर्कात येतात.


तिथून एकदा परत पूर्वी तुटलेल्या नात्याला सुरुवात केल्यानंतर अशा एक-एक ड्रामॅटिक गोष्टी घडतात की अगदी बिअरच्या बिझनेसपासून ते लोनपर्यंत प्रकरण जातं आणि शेवटी 18 लाखांचा चुना लागतो.


पुण्यातल्या एका चांगल्या एरियामध्ये घडलेलं हे सगळं प्रकरण. ज्यावेळी मी एफआयआर वाचायला घेतली, त्यावेळी डोक्यात मुंग्या आल्या. कारण नातेसंबंधांमध्ये झालेले बदल आणि एक-एक गोष्ट जशी पुढे जाते, आयुष्यामध्ये तशी किती फ्लक्चुएशन्स असतात, इमोशन्स असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एफआयआरमधून क्लिअर होतील.


अनैतिक संबंधाला चटावलेल्या बायकोने 54 वर्षाच्या नवऱ्याला संपवलं, तेही भलत्याच पद्धतीने...


थेट ज्या महिलेसोबत हे सगळं झालं, जी महिला या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे, तिने लिहिलेली एफआयआर. तिचं नाव मला रिव्हील करता येणार नाही. पण तिने काय लिहिलं आहे, हे डायरेक्ट सुरू करू.


जळगावमध्ये ही महिला शिक्षण घेत होती. त्यावेळी तिची एका मुलासोबत ओळख झाली. त्याचं नाव आपण रोहित असं ठेवून घेऊ.


या रोहितसोबत तिची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि त्यानंतर आम्ही एकमेकांना भेटायचो, हॉटेलमध्ये जायचो, सोबत फिरायचो. हे सगळं करत असताना दोघांमध्ये संमतीने संबंध प्रस्थापित झाले.


जळगावमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला आले. पुण्यात राहायला आल्यानंतरही मी मधूनमधून मुळगावी जायचे, त्याला भेटायचे. त्याने माझा विश्वास संपादन केला होता.


नवरा बायकोच्या हनिमूनला नणंद, सासू-सासरे गेले; बायको रागवली अन्..


कॉलेजच्या शिक्षणासाठी जेव्हा मी पुण्यात आले, तेव्हा सुट्टी असेल किंवा वीकेंड असेल तेव्हा आमचं बोलणं, भेटणं सगळं सुरू असायचं. पण मी शहरात राहते यावरून तो मात्र माझ्यावर वारंवार संशय घ्यायचा. त्याला असं वाटायचं की माझं आणखी कोणासोबत अफेअर सुरू आहे का? असे प्रश्न तो मला विचारायचा. त्याने मला याआधी मारहाणही केली होती.


वारंवार संशय घेणं सुरू झालं आणि त्यानंतर आमच्यात ते सगळं फाटू लागलं. आमचं पटेनासं झालं. त्यामुळे आमचं ब्रेकअप झालं. आम्ही सोबत राहणंही बंद केलं.


नंतर मी दुसरीकडे एका ठिकाणी कामाला लागले. 2023 मध्ये माझं एका व्यक्तीसोबत लग्न झालं. लग्न झाल्यानंतरसुद्धा रोहित मला वारंवार फोन करून पैसे मागायचा. पैसे दिले नाहीत तर माझे फोटो माझ्या नवऱ्याला दाखवेन, अशी धमकी द्यायचा. मला ब्लॅकमेल करायचा.


मात्र काही काळानंतर माझं माझ्या नवऱ्यासोबत पटेनासं झालं. आमच्यात वाद वाढले आणि कालांतराने आम्ही वेगळे झालो. त्यानंतर आमचा घटस्फोटही झाला.


घटस्फोट झाल्यानंतर रोहित पुण्यातच होता. आम्ही पुन्हा भेटू लागलो. त्यानंतर तो माझ्याकडे राहायला आला आणि आम्ही दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो.


आम्ही दोघं लिव्ह-इनमध्ये राहत असताना त्याने माझा विश्वास संपादन केला आणि त्याला बिअर शॉपीचा व्यवसाय सुरू करायचा असल्याचं सांगितलं. त्यासाठी पैशांची गरज असल्याचं त्याने सांगितलं.


त्याचं म्हणणं होतं की त्याचे पैसे इतरत्र अडकले आहेत. त्याचा सिबिल स्कोअर चांगला नाही, त्यामुळे त्याचं लोन मंजूर होत नाही. आपण पुढे एकत्र राहणार आहोत, व्यवसाय करू, पैसे कमावू, त्यामुळे तू माझ्यासाठी लोन काढ, असं त्याने सांगितलं.


महिलेची नोकरी सुरक्षित असल्यामुळे तिच्या नावावर लोन मंजूर होऊ शकत होतं. दोघं बँकेत गेले. तिची सर्व कागदपत्रं जमा करण्यात आली. त्यानंतर तिच्या नावावर 18 लाख रुपयांचं पर्सनल लोन मंजूर झालं.


लोनचे पैसे डिस्बर्स झाल्यानंतर ते रोहितच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले. महिलेचं म्हणणं आहे की त्याने तिच्या हातातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीसुद्धा गहाण ठेवून पैसे घेतले होते.


यानंतर ठरल्याप्रमाणे लोनचे हप्ते तो भरणार होता. मात्र काही काळानंतर त्याने हप्ते भरणं बंद केलं. मी त्याला विचारलं असता तो म्हणाला, "माझ्याकडे पैसे नाहीत. मी पैसे देऊ शकत नाही. तुला काय करायचं ते कर."


यानंतर तो मला मारण्याच्या धमक्या देऊ लागला. तसेच आपले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करीन, अशी धमकीही दिली. हे सगळं करून तो पुण्यातून जळगावला निघून गेला.


यानंतर लोनचे हप्ते भरण्यासाठी बँकेचे फोन येऊ लागले. काही हप्ते मी स्वतः भरले. पण बँकेचे फोन वाढू लागल्यानंतर मी त्याला फोन करू लागले. मात्र त्याने फोन उचलणं बंद केलं. मेसेजला उत्तर देणं बंद केलं आणि शेवटी मला ब्लॉकही केलं. त्यानंतर तो आतापर्यंत पुण्यात आलेलाही नाही.


महिलेचं म्हणणं आहे की रोहितने तिचा विश्वास संपादन करून तिची आर्थिक फसवणूक केली. आम्ही आधी रिलेशनशिपमध्ये होतो, नंतर वेगळे झालो, पुन्हा एकत्र राहू लागलो. मात्र त्याने मला 18 लाखांचं पर्सनल लोन घ्यायला लावलं आणि ते पैसे स्वतः घेतले.


या संपूर्ण प्रकरणात महिलेला 18 लाख रुपयांचा फटका बसला आहे. त्यासोबतच तिची सोन्याची अंगठीही गेली. बिअर शॉपीचा व्यवसाय सुरू झाला की नाही, याचीही तिला माहिती नाही.


मुद्दा असा आहे की तिचा आधीचा प्रियकर, नंतर पुन्हा लिव्ह-इन पार्टनर बनलेला हा व्यक्ती जळगावला निघून गेला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आता पुढे या प्रकरणात काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: एकासोबत लिव्ह-इन रिलेशन, दुसऱ्यासोबत लग्न आणि फिस्कटलेला बिअर बिझनेस.. पुण्यातील न ऐकलेली क्राईम स्टोरी
एकासोबत लिव्ह-इन रिलेशन, दुसऱ्यासोबत लग्न आणि फिस्कटलेला बिअर बिझनेस.. पुण्यातील न ऐकलेली क्राईम स्टोरी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifwB8qDZybqCvfy3TzOcNvTztvDm-e_Dqt05Xko9dgu_vrJq-9ZgVK2C6le-JpdKrRp8sSRh-6fECU8-vAB-QjyZ3AbIUXGKJRu9NKcsDhXnW8NfzUBlPqVoHucYTdBuYjThSEyqzudFHDlzF6LzhbDiOWpfJ9SWgPqaFx53q3QQ9bWQn99z2PhjaXIjU/s320/IMG_20260610_210005.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifwB8qDZybqCvfy3TzOcNvTztvDm-e_Dqt05Xko9dgu_vrJq-9ZgVK2C6le-JpdKrRp8sSRh-6fECU8-vAB-QjyZ3AbIUXGKJRu9NKcsDhXnW8NfzUBlPqVoHucYTdBuYjThSEyqzudFHDlzF6LzhbDiOWpfJ9SWgPqaFx53q3QQ9bWQn99z2PhjaXIjU/s72-c/IMG_20260610_210005.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_722.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_722.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content