बिहारच्या गोपालगंजमध्ये एका विवाह सोहळ्यात भीषण घटना घडली आहे, उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लागलं. वऱ्हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी आयोजित क...
बिहारच्या गोपालगंजमध्ये एका विवाह सोहळ्यात भीषण घटना घडली आहे, उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लागलं. वऱ्हाडी मंडळींच्या मनोरंजनासाठी आयोजित केलेल्या नृत्याच्या कार्यक्रमादरम्यान, काही तरुणांनी नर्तकीला जबरदस्तीने रंगमाचवरून खाली ओढलं, नंतर तिने प्रतिकार केल्यानंतर तिच्या पोटात गोळी झाडली.
रुग्णालयात नेताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वऱ्हाडी मंडळींसाठी नृत्य आणि पार्टीचे आयोजन
ही घटना बिहारच्या गोपालगंजच्या कटेया ठाणे परिसरातील पटोहवा गावात घडली होती. जिथे महेंद्र नावाच्या एका व्यक्तीच्या मुलीचा विवाह होता. उत्तर प्रदेशातून वऱ्हाड आले होते. वऱ्हाडी मंडळींसाठी नृत्य आणि पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 32 वर्षीय सोनू गोंड नावाचा नर्तक नाचत होता.
तरुणांनी नर्तकाला स्टेजवरून खेचून त्याला एका निर्जनस्थळी नेले अन्..
सोनू उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील महुआ पाटन गावतील रहिवासी होता. कार्यक्रम सुरू होता, लोक नृत्याचा आनंद घेऊ लागले होते. याचदरम्यान, काही तरुणांनी नर्तकाला स्टेजवरून खेचून त्याला एका निर्जनस्थळी नेले. अशातच साथीदार असलेले काही कलाकार, रामायण यादवने सांगितलं की, आम्ही लग्नात डान्स कार्यक्रमासाठी आलो होतो. इतक्यात काही तरुणांची नियत बिघडली आणि नर्तकाच्या पोटावर गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. लग्नातील काही लोक घटनास्थळावरून इकडून तिकडे पळू लागले होते.
जखमी सोनूला एका रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कटेया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, नंतर शवविच्छेदनासाठी नेला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


COMMENTS