काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही | CrimeNama
Loading ...

काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

  पुणे : कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील ५२ भाविकांचा एक गट सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकून पडला आहे. यात्रेसाठी लागण...

 


पुणे : कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या पुण्यातील ५२ भाविकांचा एक गट सध्या नेपाळची राजधानी काठमांडू येथे अडकून पडला आहे. यात्रेसाठी लागणारे आवश्यक परवाने (परमिट) मिळूनही आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही, चीन सरकारने अद्याप त्यांना व्हिसा दिलेला नाही.त्यामुळे पुढचा प्रवास पूर्णपणे रखडला असून, हवालदिल झालेल्या या भाविकांनी आता थेट भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे तातडीने मदतीची याचना केली आहे. राज्यातून सुमारे २०० भाविक काठमांडूत अडकले आहेत.


पुण्यातील ५२ भाविकांच्या गटाने टूर ऑपरेटरच्या माध्यमातून १३ जूनला चीनकडे 'व्हिसा'साठी नोंदणी केली. तत्पूर्वी चीन सरकारने त्यांना कैलास मानसरोवरला येण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यामुळे भाविकांना चीनकडून 'व्हिसा' मिळण्यात फारशा अडचणी येणार नाही, असे वाटले होते. नियोजनानुसार पुण्यातील भाविकांनी २४ जूनला काठमांडू गाठले.मात्र, चीन कडून 'व्हिसा' उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


भाविकांना काठमांडूतील हॉटेलमध्ये नाइलाजास्तव राहावे लागत आहे. त्याचा आर्थिक फटका देखील सहन करावा लागत आहे. यात्रेच्या प्रशासकीय नियमांनुसार त्यांनी सर्व प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण केली. त्यांना यात्रेसाठी लागणारे प्रशासकीय परमीट देखील प्राप्त झाले आहे. मात्र, चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला चिनी व्हिसा त्यांना अद्याप देण्यात आलेला नाही. अडकलेल्या भाविकांमध्ये पुणे, नाशिक व सोलापूर येथील नागरिकांचा समावेश आहे.


पुण्यातील आमचा ५२ भाविकांचा गट कैलास मानसरोवरला जाण्यासाठी काठमांडू येथे दाखल झाला आहे. 'व्हिसा'साठी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली तरीही १४ दिवसांपासून चीनकडून व्हिसा मिळालेला नाही. परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, आम्हाला व्हिसा मिळवून द्यावा.


-लक्ष्मीकांत खाबिया, सामाजिक कार्यकर्ते, पुणे


मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल


या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने घेतली असून, त्यांनी अडकलेल्या भाविकांशी संवाद साधला आहे. आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील संपर्क साधत लवकरात लवकर व्हिसा दिला जाईल, असे आश्वासन दिले.


COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4841,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2144,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही
काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjg4rI4OvVavyXT7oisfsJZ_RmdYpaBZQ3gNt5v0at-zAb-lhL2dgldr25goYq_Ija6mBFV5EuAcygBId_KGowrMi4wl_KnjvnQj29xudY07xZCgDm9nX0elwOVdS4J6cuG2tshZGfcCV2RO_D2x8-sSCFdAw3siCgVXqB9TcwX_ou9QsynmEhY46IQckw/s320/IMG_20260628_101357.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjg4rI4OvVavyXT7oisfsJZ_RmdYpaBZQ3gNt5v0at-zAb-lhL2dgldr25goYq_Ija6mBFV5EuAcygBId_KGowrMi4wl_KnjvnQj29xudY07xZCgDm9nX0elwOVdS4J6cuG2tshZGfcCV2RO_D2x8-sSCFdAw3siCgVXqB9TcwX_ou9QsynmEhY46IQckw/s72-c/IMG_20260628_101357.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_676.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_676.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content