पाच वर्षे एलएलबीकडे विद्यार्थ्यांची पाठ, सीईटी दिलेल्या २९ हजारांपैकी फक्त १५ हजारांची नोंदणी | CrimeNama
Loading ...

पाच वर्षे एलएलबीकडे विद्यार्थ्यांची पाठ, सीईटी दिलेल्या २९ हजारांपैकी फक्त १५ हजारांची नोंदणी

 मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी सर्व...



 मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली असताना, पाच वर्षांच्या एलएलबीसाठी अपेक्षेपेक्षा कमी नोंदणी झाल्याचे चित्र समोर आले आहे.बीपीएड, एमपीएड, तीन वर्षे आणि पाच वर्षे एलएलबी, एमएड तसेच बीएड-एमएड या सहा अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत ६७ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


सीईटी दिलेल्या ६९ हजार ४७३ विद्यार्थ्यांपैकी ४५ हजार १५८ विद्यार्थ्यांनी तीन वर्षांच्या एलएलबीसाठी नोंदणी केली असून या अभ्यासक्रमाची नोंदणी सर्वाधिक आहे. याउलट, पाच वर्षांच्या एलएलबीसाठी सीईटी दिलेल्या २९ हजार २८८ विद्यार्थ्यांपैकी केवळ १५ हजार ६०२ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी अर्ज केला आहे. म्हणजेच या अभ्यासक्रमात नोंदणीचे प्रमाण अवघे ५३.२७ टक्के आहे.


सीईटी कक्षाच्या आकडेवारीनुसार, बीपीएडसाठी ३ हजार ४५३, एमपीएडसाठी १ हजार ४५५, एमएडसाठी १ हजार ६५३ आणि बीएड-एमएड (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी ३३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण १ लाख १० हजार १०८ सीईटीधारक विद्यार्थ्यांपैकी ६१.४४ टक्के विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केले आहेत.


बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी नोटीस; मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याकडून फक्त कारणे दाखवा नोटीस


सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. बीपीएड, एमपीएड आणि तीन वर्षांच्या एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत ३० जून रोजी संपत असल्याने शेवटच्या टप्प्यात नोंदणीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.


नोंदणीची स्थिती (२९ जूनपर्यंत)


अभ्यासक्रम सीईटी दिलेले विद्यार्थी नोंदणी टक्केवारी

बीपीएड ४,९६५ ३,४५३ ६९.५५%

एमपीएड २,१३४ १,४५५ ६८.१८%

३ वर्षीय एलएलबी ६९,४७३ ४५,१५८ ६५.०१%

एमएड ३,४५१ १,६५३ ४७.९०%

बीएड-एमएड (३ वर्षीय एकात्मिक) ७९७ ३३१ ४१.५३%

५ वर्षीय एलएलबी २९,२८८ १५,६०२ ५३.२७%

एकूण १,१०,१०८ ६७,६५२ ६१.४४%

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4751,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1747,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,496,India,941,Jalgaon,37,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,369,Maharashtra,2092,Mumbai,532,Nagpur,75,Nashik,83,Politics,727,Politics.,7,Pune,2053,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,76,Technology,57,World,120,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पाच वर्षे एलएलबीकडे विद्यार्थ्यांची पाठ, सीईटी दिलेल्या २९ हजारांपैकी फक्त १५ हजारांची नोंदणी
पाच वर्षे एलएलबीकडे विद्यार्थ्यांची पाठ, सीईटी दिलेल्या २९ हजारांपैकी फक्त १५ हजारांची नोंदणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuDQ2BWjAJKqyb1qc_25n9NyCwGVfOPbueRJfvyjOzhmtKd5KJnXSVdLctnagGN1-ku5tDYYl6r0D6MwCcjwVt4ULXlVMvwm1pkCOyLfKp5yWRqqayG2aGBVsocP_hS8DAYB8aNVJN-ccEJ4XC1CQfwoVOQh-4c1Tc59Q6Y1_Bv5GrLeRUNIZGPEblADI/s320/n7179112121782807925691827b2eaf2de0f9d93ac8e90f9964326f37f8f99bba432d546433e53d7a3a59ae.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjuDQ2BWjAJKqyb1qc_25n9NyCwGVfOPbueRJfvyjOzhmtKd5KJnXSVdLctnagGN1-ku5tDYYl6r0D6MwCcjwVt4ULXlVMvwm1pkCOyLfKp5yWRqqayG2aGBVsocP_hS8DAYB8aNVJN-ccEJ4XC1CQfwoVOQh-4c1Tc59Q6Y1_Bv5GrLeRUNIZGPEblADI/s72-c/n7179112121782807925691827b2eaf2de0f9d93ac8e90f9964326f37f8f99bba432d546433e53d7a3a59ae.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_667.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_667.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content