बऱ्याच लोकांची सकाळची सुरूवात चहानं होते. जोपर्यंत १ कप चहा पीत नाही तोपर्यंत दिवसाची सुरूवातच होत नाही असे बरेच लोक असतात. अनेक घरांमध्ये...
बऱ्याच लोकांची सकाळची सुरूवात चहानं होते. जोपर्यंत १ कप चहा पीत नाही तोपर्यंत दिवसाची सुरूवातच होत नाही असे बरेच लोक असतात. अनेक घरांमध्ये रोज चहा केला जातो पण ढाब्यावर किंवा चहाच्या गाडीवर मिळतो तसा चहा घरी होत नाही.तुम्हालाही ढाब्यासारखा कडक चहा हवा असेल तर चहा करताना त्यात काही पदार्थ मिसळायला हवेत. ज्यामुळे चहाची चव दुप्पटीनं वाढेल. याशिवाय चहाला चवही चांगली येईल.छोटी वेलची (Cardamom)
वेलची आपण अनेक गोड पदार्थांमध्ये घालतो. चहामध्ये वेलची घातल्यानं चहाला एक वेगळा फ्लेवर येतो. वेलची फक्त चहाची चव वाढवत नाही तर चहाचा सुगंध तिप्पटीनं वाढवते. योग्य प्रमाणात वेलची घातल्यास चहाचा फ्लेवर एकमद छान येतो. चहाची चव वाढवण्यासाठी वेलची आवर्जून घाला. टपरीस्टाईलचा चहा घरी करण्यासाठी तुम्हाला बेसिक साहित्य लागेल. १ कप पाणी, १ कप दूध, २ छोटी वेलची, १ ते २ चमचे चहा पावडर, साखर आणि थोडं आलं. हे साहित्य लागेल.
चहा करण्याची योग्य युनिक पद्धत (Right Way To Make Milk Tea)
एका भांड्यात आधी पाणी उकळवायला ठेवा. त्यानंतर २ वेलची यात घाला आणि वेलची बारीक पावडर न करता छोटी बारीक करून घाला. त्यात थोडं आलं घाला. २ ते ३ मिनिटं व्यवस्थित उकळल्यानंतर तसंच ठेवा.नंतर दूध आणि साखर घालून मंद आचेवर व्यवस्थित शिजू द्या. नंतर ५ मिनिटांनी गॅस बंद करा. ज्यामुळे चहा अधिक सुगंधित होतो. जर तुम्हाला जास्त कडक चहा आवडत असेल तर चहा पावडरचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल. चहा २ ते ३ मिनिटांपेक्षा जास्त उकळवू नका. ताजी बारीक केलेली वेलची यात घाला. अन्यथा चव येणार नाही.
वेलची घातलेला चहा पिण्याचे फायदे (Benefits Of Cardamom Tea)
वेलची घातलेला चहा प्यायल्यानं फक्त चवच नाही तर शरीराला बरेच फायदेही मिळतात. वेलचीत अनेक एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे पचनाशीसंबंधित समस्या उद्भवत नाहीत. हा चहा प्यायल्यां पचनक्रिया चांगली राहते. ताण कमी होण्यासही मदत होते.


COMMENTS