बिहार :एका तरुणाने आपल्या प्रेमिकेला भेटण्यासाठी तिचे घर गाठले होते. मात्र, त्याला ही भेट खूप महागात पडली आणि अखेर परिस्थिती अशी ओढवली की त्...
बिहार :एका तरुणाने आपल्या प्रेमिकेला भेटण्यासाठी तिचे घर गाठले होते. मात्र, त्याला ही भेट खूप महागात पडली आणि अखेर परिस्थिती अशी ओढवली की त्याला थेट लग्नाच्या बेडीत अडकावे लागलेया घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. पण या घटनेमागे अत्यंत विचित्र प्रकार आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडले
प्रेमात आकंठ बुडालेला गोलू महतो या तरुणाचे ममता कुमारी नावाच्या तरुणीवर प्रेम होते. गोलू हा रती भगवानपूरचा रहिवासी असून त्याला आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने कोणताही विचार न करता ममताच्या घरी धडक मारली. गोलू गुपचूप ममताच्या घरी पोहोचला खरा, मात्र त्याचे हे येणे कोणालाही आवडले नाही. जेव्हा हे दोघेही घरात एकत्र होते, तेव्हा अचानक कुटुंबीयांनी त्यांना रंगेहाथ पकडले. घरातील गोंधळ आणि आरडाओरडा ऐकून परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने तिथे जमा झाले आणि संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
गावकऱ्यांनी मावशीसोबत लग्न लावून टाकलं
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी नात्याने या तरुणाची सख्खी मावशी लागते. प्राप्त माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. गोलू अनेकदा तिच्या घरी येत असे, मात्र कोणालाही त्यांच्या या नात्यावर संशय आला नव्हता. पण जेव्हा कुटुंबीयांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले, तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. नातेसंबंधातील ही अनैतिकता पाहून गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लोक या प्रकारावर प्रचंड टीका करत आहेत.
या सर्व प्रकारानंतर गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी मिळून घेतलेल्या निर्णयामुळे या घटनेला एक वेगळे वळण मिळाले. सर्वांच्या उपस्थितीत आणि संमतीने या प्रेमी युगलाचे लग्न लावून देण्यात आले. या विवाहाचा व्हिडिओ कोणीतरी चित्रीत केला, जो आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोलू, ममताच्या भांगेत सिंदूर भरताना दिसत आहे, तर ममता या प्रसंगात रडताना दिसून येत आहे. गोलूला विचारले असता त्याने आपण स्वतःच्या इच्छेने हे लग्न करत असल्याचे सांगितले. सध्या हे प्रकरण बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा विषय बनले आहे.


COMMENTS