उत्तराखंडमधील उधमसिंहमधील पुलभट्टा पोलीस ठाणे परिसरातील एका हॉटेलात दोन मुलांच्या आईने एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवताना नवऱ्याने तिला रं...
उत्तराखंडमधील उधमसिंहमधील पुलभट्टा पोलीस ठाणे परिसरातील एका हॉटेलात दोन मुलांच्या आईने एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवताना नवऱ्याने तिला रंगेहाथ पकडलं. या घटनेनं घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेतली. तरुणाची जमावापासून सुटका करून त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी हॉटेलचा देखील तपास करण्यात आला.
नवऱ्यानं बायकोला हॉटेलच्या खोलीत रंगेहात पकडलं
मंगळवारी दुपारच्या सुमारास दारू भागातील दोन मुलांची आई, एका तरुणासोबत पुलभट्टा येथील एका हॉटेलमध्ये आली होती. पतीच्या तिच्यावर अधिकचा संशय होता, त्याने अनेकदा तिचा पाठलाग केला आणि काही लोकांना घेऊन तो हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने त्यांना खोलीत रंगेहाथ पकडलं.संबंधितांनी त्यांना घेरलं आणि त्या तरुणाला आणि महिलेला बेदम मारहाण केली. या प्रकरणाने दोन समुदायांचा समावेश असल्याने गोंधळाची माहिती मिळताच पुलभट्टा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अज्ञातांनी मारहाणीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले
यादरम्यान, अज्ञातांनी मारहाणीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. पोलिसांना कसाबसा त्या तरुणाला जमावाच्या गर्दीतून सोडवण्यात आले आणि त्याला बाईकवर बसवून पोलीस ठाण्यात नेले. तसेच संबंधित महिलेला देखील पोलीस ठाण्यात आणले.


COMMENTS