प्रत्येक घरातील धोका! भयावह वास्तव उघड करणारी श्रेयस तळपदेची 'द इंडिया स्टोरी' | CrimeNama
Loading ...

प्रत्येक घरातील धोका! भयावह वास्तव उघड करणारी श्रेयस तळपदेची 'द इंडिया स्टोरी'

  प्रत्येक घराशी संबंधित समस्या आहे, पण तिच्या दीर्घकालीन परिणामांचा आपण फारसा विचार करत नाही. दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषार...

 


प्रत्येक घराशी संबंधित समस्या आहे, पण तिच्या दीर्घकालीन परिणामांचा आपण फारसा विचार करत नाही. दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या धोका

अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण दूरगामी परिणाम करणारी गंभीर समस्या, कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव... आणि ते सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे मराठी अभिनेता श्रेयस तळपदे. 'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या फिल्मच्या माध्यमातून. ज्याचा दमदार टिझर रिलीज झाला आहे.


'द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस' या चित्रपटात कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजावर होणारा गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दररोज लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या धोक्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


चित्रपटाच्या टीझरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे न्यायासाठी लढताना तसेच कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव उघड करताना दिसतात. दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या धोक्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथेद्वारे, अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण दूरगामी परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा चित्रपट प्रयत्न करतो.


यात श्रेयस तळपदेने एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, जो याच समस्येमुळे आपल्या मुलीला गमावतो आणि त्या समस्येविरोधात लढा देतो. श्रेयस तळपदे म्हणाला, "माझ्या व्यक्तिरेखेच्या प्रवासातून एका सामान्य वडिलांचा मोठ्या व्यवस्थेविरुद्धचा भावनिक संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी मला आशा आहे. हा चित्रपट मनोरंजन तर करेलच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे एका आवश्यक चर्चेला सुरुवात करेल."


तर काजल अग्रवाल म्हणाली, "आई म्हणून ही कथा मला वैयक्तिक पातळीवर खूप भावली, कारण आज अनेक पालकांच्या मनात असलेल्या भीती आणि चिंतेचं प्रतिबिंब यात दिसतं. टीझर समाजापासून अनेकदा लपून राहणाऱ्या वास्तवाची झलक दाखवतो. हा चित्रपट लोकांमध्ये जागरूकता निर्माण करेल आणि ते आपल्या अन्नाबाबत तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत अधिक सजग होतील, अशी अपेक्षा आहे."


चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, "'द इंडिया स्टोरी' हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाने एकत्र येऊन चर्चा करावी असा विषय आहे. कीटकनाशक शेती ही प्रत्येक घराशी संबंधित समस्या आहे, पण तिच्या दीर्घकालीन परिणामांचा आपण फारसा विचार करत नाही. या कथेद्वारे आम्ही कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर वास्तवावर आणि त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्य संकटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. टीझर ही या मोठ्या समस्येची फक्त एक झलक आहे. आमचा उद्देश जनजागृती करणं, विचारांना चालना देणे आणि आपल्या ताटात नेमकं काय येतं याबद्दल लोकांनी प्रश्न विचारावेत, हा आहे."




'द इंडिया स्टोरी' हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: प्रत्येक घरातील धोका! भयावह वास्तव उघड करणारी श्रेयस तळपदेची 'द इंडिया स्टोरी'
प्रत्येक घरातील धोका! भयावह वास्तव उघड करणारी श्रेयस तळपदेची 'द इंडिया स्टोरी'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCZek8F-ShhYG1qVxpIz8aa6W_YwLseRcV3zr-vr8GeXxfHImcmcGcwxJ9J5upNKshEMEzVYpJuXiqN134PktY0ULWjJkfkrxkpzMBa1ilnYJHRWOqa1TT-Dwi8059L8xaJsWqrY3mbNVTGUCYrJ2j_q_w8qVCt2EmtgrVZh4jd5K7q5pitx3eXxMnBAU/s320/n71745629817824652086567bb6a61f975c82ef41b4101bcbe0dcdcff90414512aa7b082643471a7fe2c62c.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCZek8F-ShhYG1qVxpIz8aa6W_YwLseRcV3zr-vr8GeXxfHImcmcGcwxJ9J5upNKshEMEzVYpJuXiqN134PktY0ULWjJkfkrxkpzMBa1ilnYJHRWOqa1TT-Dwi8059L8xaJsWqrY3mbNVTGUCYrJ2j_q_w8qVCt2EmtgrVZh4jd5K7q5pitx3eXxMnBAU/s72-c/n71745629817824652086567bb6a61f975c82ef41b4101bcbe0dcdcff90414512aa7b082643471a7fe2c62c.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_602.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_602.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content