उत्तर प्रदेश : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन सरकार यांनी राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसवर गंभीर आरोप...
उत्तर प्रदेश : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन सरकार यांनी राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसवर गंभीर आरोप केले आहेत.त्यांनी ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंपत राय यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ओवेसींचा दावा आहे की, जर राम मंदिर ट्रस्टमध्ये एखादा मुस्लिम सामील असता, तर घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले असते.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ते पत्रकारांशी बोलेत होते. ओवैसी म्हणाले, "आता मला विचारण्यात आले की मी यावर प्रतिक्रिया द्यावी. मी फक्त एवढेच म्हटले की ट्रस्टमध्ये एक चूक झाली. तुम्ही एका मुस्लिमाला त्या ट्रस्टचा सदस्य बनवले असते आणि नंतर, जेव्हा घोटाळा उघडकीस आला, तेव्हा तुम्ही त्या मुस्लिमाला चकमकीत ठार मारले असते, बुलडोझरने त्याचे घर पाडले असते आणि प्रकरण बंद केले असते."
चंपत राय यांची मजा -
ओवैसी म्हणाले, "चंपत राय यांची तर मजा चालली आहे. मला सांगा काय चालले आहे? कोणाचे घर पाडले जात नाहीये? ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांना पोलीस कोठडीसुद्धा दिली जात नाही." आता, कदाचित, आज बोलल्यानंतर पोलीस उद्या त्याला ताब्यात घेतील. आज उत्तर प्रदेशात काय चालले आहे?
भाजपवर आरोप -
"आम्हाला भाजप आणि आरएसएसला विचारायचे आहे की हा चंपत राय तुमची आवडती व्यक्ती आहे की नाही? ते आम्हाला म्हणतात की, पाकिस्तानी, जिहादी, बांगलादेशी आहे. मग हा राम माधव पाकिस्तानसोबत राजनैतिक संबंध कसे ठेवतो आहे? त्याच पाकिस्तानने पहलगाममध्ये २६ भारतीयांना गोळ्या घालून ठार केले. त्याच पाकिस्तानने दिल्लीतील लाल किल्ल्यावरील आत्मघाती बॉम्बस्फोटांना पाठिंबा दिला, ज्यात ५० लोक ठार झाले.


COMMENTS