डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् दगडानं ठेचलं डोकं, बॉडी बिल्डरला क्रूरपणे संपवलं; बायकोसोबत... | CrimeNama
Loading ...

डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् दगडानं ठेचलं डोकं, बॉडी बिल्डरला क्रूरपणे संपवलं; बायकोसोबत...

  Crime News : एका बॉडी बिल्डरच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणाचा संशय आणि जुन्या वादातून एका जिम चालक आणि बार बाउन्सरची ...

 


Crime News : एका बॉडी बिल्डरच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणाचा संशय आणि जुन्या वादातून एका जिम चालक आणि बार बाउन्सरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपीने आधी तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला असहाय्य केले आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.


मित्रांसोबत मद्यपान


निखिल गोस्वामी असे मृत बिल्डरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो बिलासपूरमधील एका बारमध्ये बाउन्सर म्हणून काम करायचा आणि सोबतच एक जिम देखील चालवायचा. गुरुवारी (4 जून) रात्री तो काही कामानिमित्त कोटा येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर गेला होता. तिथे तो आपल्या काही मित्रांसोबत बसून मद्यपान करत असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान, भोला मानिकपुरी नावाचा एक तरुण तिथे पोहोचला आणि खाजगी कारणावरून त्या दोघांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा वाद अचानक इतका वाढला की आरोपीने आधी निखिलच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. डोळ्यात मिरची गेल्यामुळे निखिलला काही समजायच्या आतच आरोपीने जवळच पडलेला एक जड दगड उचलला आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाल्यामुळे निखिल रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला.

विवाहित महिलेसोबत संबंध?

घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिक लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सिम्स बिलासपूर येथे रेफर करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे संपूर्ण प्रकरण प्रेमप्रकरण आणि चारित्र्याच्या संशयाशी जोडलेले असल्याचे दिसते आहे. एका महिलेसोबत असलेल्या निखिलच्या जवळीकतेमुळे त्या महिलेच्या पतीला बऱ्याच काळापासून संशय होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून हत्येमागील वास्तविक कारणाचा शोध घेत आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,97,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4806,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1765,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,497,India,952,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,374,Maharashtra,2126,Mumbai,536,Nagpur,77,Nashik,85,Politics,741,Politics.,7,Pune,2061,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,123,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् दगडानं ठेचलं डोकं, बॉडी बिल्डरला क्रूरपणे संपवलं; बायकोसोबत...
डोळ्यात मिरचीपूड टाकली अन् दगडानं ठेचलं डोकं, बॉडी बिल्डरला क्रूरपणे संपवलं; बायकोसोबत...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwRVlb7ejd-AEhidk_xgYlJ8F25U53VAgBIZqIy0QjXqCHBpktNE1eV9CSgAVP3cftYuVamZIUTwTvF773BrmbAk6NfE0jXkrptr0zFPicC_3UBXrNxON8KngjdyVnmlhYF53zr8_jwE5dlSi2pT5PbRNEkxt1lBZ8ZsnysbP6ECDfOtI9twjEM7VHahE/s320/n7151485451780810409885d7459d914e9802298e972ba744143be37f9688db2919a680f643f92deb946b2e.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiwRVlb7ejd-AEhidk_xgYlJ8F25U53VAgBIZqIy0QjXqCHBpktNE1eV9CSgAVP3cftYuVamZIUTwTvF773BrmbAk6NfE0jXkrptr0zFPicC_3UBXrNxON8KngjdyVnmlhYF53zr8_jwE5dlSi2pT5PbRNEkxt1lBZ8ZsnysbP6ECDfOtI9twjEM7VHahE/s72-c/n7151485451780810409885d7459d914e9802298e972ba744143be37f9688db2919a680f643f92deb946b2e.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_587.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_587.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content