लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे. अशात जून महिना संपायला आता ६ दिवस बाकी आहेत. मात्र, अद्याप...
लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे. अशात जून महिना संपायला आता ६ दिवस बाकी आहेत. मात्र, अद्यापही जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहीणींकडून विचारला जातो आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २८ ते ३० जूनदरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून यापूर्वीही अनेकदा महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यात आले होते. त्यानंतर मे महिन्याचा निधी १६ जून रोजी जारी करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी महिलांना बऱ्याच दिवस वाच बघावी लागली होती. आता जून महिन्याचा हप्तासाठीही महिलांना वाट बघावी लागते आहे. मात्र, लवकरच खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा महिलांना आहे.
दरम्यान, योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने काही नियम अधिक काटेकोर केले आहेत. या निधीसाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. खाते आधारशी जोडलेले नसल्यास सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे महिलांनी आधार कार्ड बँक खात्यांशी लींक आहे की नाही, हे बघणं गरजेचं आहे.
याशिवाय सरकारने नुकतीच ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची पडताळणी केली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात सध्या सुमारे एक कोटी ७० लाख पात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.


COMMENTS