पत्नीने स्वतःहून स्वतःचे जीवन संपवले होते. या प्रकरणात पतीवर आरोप झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालायने आज या पतीची निर्दोष मुक्तता केली आह...
पत्नीने स्वतःहून स्वतःचे जीवन संपवले होते. या प्रकरणात पतीवर आरोप झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालायने आज या पतीची निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी न्यायालायने पती पत्नी यांच्यात मतभेद होणे हा वैवाहिक जीवनाचा भाग आहे.
यामुळं दोन्ही जोडीदार एकमेकांशी बोलणं देखील थांबवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या मते पती पत्नीशी बोलत नाही या एकाच ग्राऊंडवर पतीला क्रूर ठरवून त्याला दोषी ठरवू शकत नाही.
जस्टीस जे. के. महेश्वरी आणि अतुल एस चांदुरकर यांच्या बेंचने ट्रायल कोर्ट आणि मद्रास उच्च न्यायालयाने ज्या पुरूषाला दोषी ठरवले होते त्याची मुक्तता केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने इंडियन पीनल कोड ४९८ अ अंतर्गत या पतीला पत्नीविरूद्ध क्रुरता दाखवल्याबद्दल दोषी ठरवून तीन वर्षाचा तुरंगवास ठोठवला होता.
ज्यावेळी घटना घडली त्यावेळी पती १३ दिवसांपासून पत्नीसोबत बोलत नव्हता. त्यानंतर पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं होतं. याबाबत सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, 'इतर कोणतेही सबळ पुरावे नसताना फक्त पती १३ दिवस पत्नीसोबत बोलला नाही म्हणून तसेच याबाबतचे सबळ पुरावे सादर केलेले नसताना हे प्रकरण क्रूरतेच्या कक्षेत येत नाही.
न्यायालयाने या प्रकरणात पती पत्नीमध्ये भांडण, वादावादी झाल्याचे कोणतेही सबळ पुरावे नाहीत जेणेकरून पतीविरूद्धचे क्रूरतेचे आरोप सिद्ध होतील असं देखील निरीक्षण नोंदवलं. उच्च न्यायालयाला हा मुद्दा विचारात घेण्यात अपयश आलं आहे असं देखील निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने नोंदवले.
सर्वोच्च न्यायालयाने या सारख्या प्रकरणांमध्ये तेवढं तथ्य किंवा गांभिर्य आहे का आणि अन् त्यामुळं महिला टोकाचे पाऊल उचलले आहे का किंवा या कृतीमुळे तिचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे का हे निश्चित करणं गरजेचं आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेने ज्यावेळी ती तिच्या माहेरी होती त्यावेळी तिने गळफास लावून आपलं जीवन संपवलं होतं. यानंतर कोर्टात केस दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्यांनी लग्नावेळी महिलेला तीन लाख रूपये २० सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर याचिकेत पती कामय त्या महिलेला तुझ्या पालकांकडून पैसे घेऊन ये असा तगादा लावत असल्याचा आरोप करण्यात आला. हुंड्यासाठी मुलाचा छळ होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यता आला होता.


COMMENTS