प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्... | CrimeNama
Loading ...

प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...

  Crime News : जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण (DRDA) कार्यालयातून महिलांच्या सुरक्षेशी अत्यंत किळसवाणा खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला ...

 


Crime News : जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण (DRDA) कार्यालयातून महिलांच्या सुरक्षेशी अत्यंत किळसवाणा खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर लिपिकाने महिला स्वच्छतागृहात गुप्त (स्पाई) कॅमेरा बसवून महिलांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या प्रकरणाचा भंडाफोड जगतसिंहपूरचे पोलीस अधीक्षक अंकित वर्मा यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला असून, आरोपीचे नाव संजय अडेखा असे असल्याचे जाहीर केले आहे.

मानसिक त्रास देण्यासाठी घाणेरडी युक्ती

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक कृती करण्यामागे एक विकृत सूडाची भावना असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यालयातच काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याने संजयचा प्रेमाचा प्रस्ताव (लव्ह प्रपोजल) स्पष्टपणे नाकारला होता. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि तिला मानसिक त्रास देण्यासाठी त्याने ही घाणेरडी युक्ती लढवली. संजयने या वर्षाच्या सुरुवातीला यूट्यूबवर व्हिडिओ पाहून स्पाई कॅमेरा कसा वापरायचा आणि त्याचे तांत्रिक बारकावे काय आहेत, याची माहिती घेतली. त्यानंतर त्याने ऑनलाइन एक गुप्त कॅमेरा मागवला आणि मार्च महिन्यात कार्यालयातील महिलांच्या स्वच्छतागृहात तो लपवून बसवला. त्यानंतर तो दर आठवड्याला नियमितपणे कॅमेऱ्याची बॅटरी काढण्यासाठी आणि पुन्हा चार्ज करून लावण्यासाठी तिथे जात असे.


पेन ड्राइव्ह आणि सीसीटीव्हीची हार्ड डिस्क जप्त


महिला सहकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले आणि त्यांनी सापळा रचून शनिवारी या लिपिकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ठिकाणांवर धाड टाकून एक गुप्त स्पाई कॅमेरा, त्याचे मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह आणि सीसीटीव्हीची हार्ड डिस्क जप्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपीला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेले सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत, जेणेकरून या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंचा वापर कोणत्याही चुकीच्या हेतूने किंवा ऑनलाइन अपलोड करण्यासाठी केला गेला आहे का, याचा तपास करता येईल.


अटकेनंतर कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या आरोपीने आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त करण्याचा दिखावा केला आहे. त्याने पोलीस आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर हात जोडून माफी मागितली आणि आपल्यावर दया दाखवण्याची विनवणी केली. मात्र, महिलांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा गंभीर भंग केल्यामुळे पोलीस याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत असून कडक कारवाईची तयारी करत आहेत. या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपीवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आता वेगाने सुरू करण्यात आली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,77,Ahmednagar,86,Amaravati,19,Aurangabad,38,Breakin,1,Breaking,4293,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,3,Crime,1592,Dhule,14,Entertainmen,1,Entertainment,67,Gadchiroli,5,Health,463,India,808,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,27,Lifestyle,346,Maharashtra,1823,Mumbai,447,Nagpur,56,Nashik,73,Politics,635,Pune,1954,Raigad,27,Ratnagiri,19,Sangali,36,Satara,50,Sindhudurg,5,Solapur,47,Sport,67,Technology,39,World,75,पुणे,2,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...
प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj4rhola6x5XYpENPskdlhwu2zVHr03oNbIokf1dvg4SXXwTPwwOpiLw7xO6HxcRlO9Qvt-zMclPuPaJsmPZTleOZyR5DVjMFiGwIJhtg4HVjnIEHwR8HCsXdNAmc3U3hRObEH6V4i1MP-gE3HZX2scOvaPeYZFuhQL0FoTF-UTLJqHeBsdSvMXjW68Lik/s320/n71440845517803045614600b85bd5ccec6c0e4a4d4bb05848dd2fd710e389645e7680fde40fec88ef534da.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj4rhola6x5XYpENPskdlhwu2zVHr03oNbIokf1dvg4SXXwTPwwOpiLw7xO6HxcRlO9Qvt-zMclPuPaJsmPZTleOZyR5DVjMFiGwIJhtg4HVjnIEHwR8HCsXdNAmc3U3hRObEH6V4i1MP-gE3HZX2scOvaPeYZFuhQL0FoTF-UTLJqHeBsdSvMXjW68Lik/s72-c/n71440845517803045614600b85bd5ccec6c0e4a4d4bb05848dd2fd710e389645e7680fde40fec88ef534da.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_563.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_563.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content