माणसाच्या आयुष्यात त्याचे चारित्र्य महत्त्वाचे असते आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी योग्य सवयी असणे आवश्यक बाब आहे. आयुष्यात यशस्वी झालेल्...
माणसाच्या आयुष्यात त्याचे चारित्र्य महत्त्वाचे असते आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी योग्य सवयी असणे आवश्यक बाब आहे. आयुष्यात यशस्वी झालेल्या लोकांपैकी ९० टक्के लोकांच्या सवयी चांगल्या असतात त्यांच्या जीवनशैलीची पद्धत ठरलेली असते.त्याप्रमाणे ते गोष्टी करत असतात. ज्यांची जीवनशैली चांगल्या सवयींनी घडलेली आहे अशा लोकांचा संपूर्ण दिवस हा पूर्वनियोजित केलेला असतो. तुम्ही दिवसभर करत असलेल्या सर्व गोष्टींचे नियोजन असणे आणि ते पाळणे यामध्ये यशस्वी आयुष्याचे गुपित दडले आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरी यशाचा थेट संबंध तुमच्या जीवनशैलीशी निगडित आहे. यशस्वी होण्यासाठी जीवनशैली उत्तम असणे महत्त्वाचे आहे. चांगल्या जीवनशैलीसाठी उत्तम सवयींची गरज आहे. आपल्या पाल्याला योग्य वयात चांगल्या सवयी लावणे यामध्ये पालकांचा फार मोठा वाटा आहे.
चांगल्या सवयी
लवकर उठणे व व्यायाम करणे.
योग्य वेळी आणि योग्य ब्रेकफास्ट करणे.
नोकरी/व्यवसायात पुरेसा वेळ देणे. सर्व कामे पूर्ण उत्साहात करणे.
रात्री योग्य वेळी झोपणे
शरीराला पूर्ण विश्रांती देणे
उशिरापर्यंत खात राहणे तब्येतीला चांगले नाही (कधीतरी मजा करणे वेगळे)
करमणूक प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यातील आवश्यक घटक आहे. आपल्या आवडीप्रमाणे संगीत खेळ, नाटक, सिनेमा, व्यायाम, ट्रीप ट्रॅव्हल यासाठी वेळ देणे व त्यावर योग्य पैसे खर्च करणे महत्त्वाचे आहे.
कुटुंबासाठी व मुलांसाठी वेळ देणे
आपण खेळाचा विचार केल्यास खेळामध्ये सध्या पैसा खूप आलेला आहे. आणि क्रिकेटमध्ये तर खूपच जास्त. परंतु खेळातील यश अपयश या दोन्हींमुळे खेळाडूंच्या सवयींमध्ये फरक पडतो. हा फरक त्यांच्या करिअरला अत्यंत घातक असतो. तुम्हाला जास्त काळ फिट राहण्यासाठी तुमच्या ज्या दैनंदिन आयुष्यातल्या सवयी आहेत तो महत्त्वाचा घटक आहे. या सवयी तुम्ही कसोशीने पाळल्यास त्याचा नक्कीच अतिशय सकारात्मक फायदा होतो. तुमच्या सवयी, तुमची जीवनशैली हा विषय इतका महत्त्वाचा आहे की, तुमची निवड यावर अवलंबून आहे हे जाणून घेतले पाहिजे. आयुष्यात आणि खेळात तुम्हाला मोठी इनिंग खेळायची असेल तर, चांगली जीवनशैली आणि चांगल्या सवयी याला पर्याय नाही.



COMMENTS