विशेष प्रतिनिधी | प्रा. निलेश आमले सर जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे रविव...
विशेष प्रतिनिधी | प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे रविवार दिनांक २१/०६/ २०२६ रोजी सकाळी ठीक ७.०० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी वाढत्या वयात होणाऱ्या समस्या व योगाद्वारे समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय यावर मार्गदर्शन केले. योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन योगवर्गात सहभाग घेतला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयातील योगशिक्षक प्रा.विक्रम रसाळ व योगशिक्षक प्रा.निलेश आमले यांनी महाविद्यालयातील पुरुष कर्मचारी वर्गाचा व योगशिक्षिका प्रा वैशाली सावंत यांनी महाविद्यालयातील महिला कर्मचारी वर्गाचा योग अभ्यास प्रशिक्षण देऊन त्यांना योगाचे मानवी जीवनात असणारे महत्व सगिंतले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे ,संस्था पदाधिकारी विश्वस्त मंडळ तसेच अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिल बडे यांनी व आभार प्रा.मयूर बोंबले यांनी मानले.




COMMENTS