Indians in Europe: जर्मनीत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती म्हणतेय, इथे युरोपीयन लोकं मान देतात पण भारतीय लोकं अ...
Indians in Europe: जर्मनीत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती म्हणतेय, इथे युरोपीयन लोकं मान देतात पण भारतीय लोकं अपमान करतात. मालमत्तेवर कब्जा केल्यासारखी प्रतिक्रिया देतात.
असं म्हणतात की, घरापासून दूर गेलं की घरची आठवण जास्त येते. अशा वेळी मग ओळखीचा माणूस दिसला, तरी देखील खूप आनंद होतो. आणि हीच गोष्ट विदेशात गेल्यावरही जाणवते. दुसऱ्या देशात अचानक एखादा भारतीय दिसला की आनंद होतो, कारण त्या व्यक्तीच्या माध्यमातून कळत-नकळत आपल्या देशाची आठवण येते. पण खरंच वास्तवात असं काही घडतं का? असा प्रश्न निर्माण करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी वेगळाच अनुभव सांगताना दिसतेय. ही तरुणी जर्मनीमध्ये राहतेय आणि ती म्हणतेय, इथे भारतीय लोक एकमेकांना पाहून नाकं मुरडतात.नेमकं काय म्हणाली ही तरुणी?
हा व्हिडीओ nomadic_swadha या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका भारतीय तरुणीला पाहू शकता. ती म्हणतेय की, इथे भारतीय लोक एकमेकांना पाहिल्यानंतर नाकं मुरडतात. एखादा युरोपीय व्यक्ती तुमच्याकडे पाहून स्माईल देईल. पण जर तुम्ही एखाद्या भारतीय व्यक्तीकडे पाहून हात दाखवला किंवा स्माईल दिली, तर तो व्यक्ती तोंड फिरवेल. जणू तुम्ही त्याची संपत्तीच हडपली आहे, असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतील.
पुढे ती स्वतःचा अनुभव सांगताना म्हणते की, तिनं एका भारतीय व्यक्तीला पाहून स्माईल केली. पण त्याची प्रतिक्रिया पाहून तिला अपमानास्पद वाटलं. त्यामुळे विदेशात गेल्यावर तरी एकमेकांना थोडाफार मान द्या, असा सल्ला ती देतेय.
नेटकरी काय म्हणताहेत?
हा व्हिडीओ ३७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत, "तू आपले भारतीय संस्कार विसरू नकोस," असा सल्ला दिला आहे. दरम्यान, एका नेटकऱ्यानं युरोपमध्ये काम करतानाचा वेगळाच अनुभव सांगितला आहे. त्याच्या मते, भारतीय लोक तिथे सतत एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ऑफिसमध्ये बॉसला खुश करण्यासाठी आपल्या भारतीय सहकाऱ्यांच्या तक्रारी करतात. तर आणखी एका यूजरनं उपरोधिक टोला मारत म्हटलं की, भारतीयांना फक्त विदेशी लोकांनाच मान देता येतो.
(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता crimenama live ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)


COMMENTS