मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन | CrimeNama
Loading ...

मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक पुत्र केतन विशाल अग्रवाल यांच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता नवे आणि धक्कादायक वळ...



पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक पुत्र केतन विशाल अग्रवाल यांच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे.

हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचं समोर आलंय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पुण्यातील लुलनगर परिसरातील एका कॅफेमध्ये जवळपास 55 मिनिटे बसून संपूर्ण कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कॅफेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे एकत्र बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहताना, एकमेकांशी चर्चा करताना आणि लोहगडाशी संबंधित माहिती पाहत असल्याचे तपासात समोर आले आहे. याच भेटीत पुढील दिवसाच्या घटनांची आखणी करण्यात आली होती.

मोबाईलवर लोहगडाचे व्हिडिओ पाहिले


पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयलने यापूर्वीच लोहगड परिसराची रेकी केली होती. त्यानंतर तिने मोबाईलवर लोहगडाशी संबंधित माहिती आणि व्हिडिओ शोधल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कॅफेमधील भेटीदरम्यान दोघांनी मोबाईलवर लोहगडाचे व्हिडिओ पाहिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचवेळी दोघांमधील जवळीकही फुटेजमध्ये दिसून येत असल्याचे तपासातून समोर आले आहे. ही भेट केवळ सामान्य नव्हती, तर त्यामध्ये गुन्ह्याचा कट रचला गेला असावा, अशी शक्यता तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या सीसीटीव्ही फुटेजला तपासात महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे.

चेतन चौधरीने गडावर अत्यंत कमी वेळ घालवला


पोलिसांनी चेतन चौधरीच्या हालचालींचाही तपशील उघड केला आहे. घटनेच्या दिवशी त्याने स्वतःचा मोबाईल आपल्या वडिलांच्या दुकानात ठेवला होता आणि दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल सोबत घेतला होता. त्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलचे लोकेशन लोहगड परिसरात आढळल्यामुळे पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याने चेतनच्या अनुपस्थितीत त्याच्या मोबाईलवर आलेले फोनही स्वीकारल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दुसरीकडे, लोहगड परिसरातील सीसीटीव्ही आणि वेळेच्या नोंदींचा अभ्यास केल्यानंतर चेतन चौधरीने गडावर अत्यंत कमी वेळ घालवला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या वेळेतील विसंगतीमुळे त्यांच्यावरचा संशय अधिक बळावला होता.


या प्रकरणात सिया गोयलच्या आई-वडिलांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंधांची त्यांना कोणतीही माहिती नव्हती. त्यांनी केतन अग्रवाल हा चांगला मुलगा असल्याचे सांगत, जर सिया दोषी आढळली तर तिला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. तपासात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, इंटरनेट वापराची माहिती आणि अन्य तांत्रिक पुरावे एकत्र करून संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4832,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1769,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,961,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2141,Mumbai,539,Nagpur,77,Nashik,85,Politics,752,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन
मर्डरपूर्वी चेतनची गळाभेट, कॅफेतील बैठक आणि गर्लफ्रेंडचं चुंबन
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiXKQV1aZyZSLhoSWmvOi-MU6tVmz1_jaxIorfpVetn2qfHRSH8S8AgIHpHUgITpMQ5QBUiLz55-XH7UoDBT933at5lG11azXp9-AdEKqb0YJdQHgD_02gjaAv7YkmawYx77mSiBNeSqsvonve8yKh3jBP4FNTay4WI05m2HJwwMIzvjoEeNyQHWQ0Cdc/s320/1002379782.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjiXKQV1aZyZSLhoSWmvOi-MU6tVmz1_jaxIorfpVetn2qfHRSH8S8AgIHpHUgITpMQ5QBUiLz55-XH7UoDBT933at5lG11azXp9-AdEKqb0YJdQHgD_02gjaAv7YkmawYx77mSiBNeSqsvonve8yKh3jBP4FNTay4WI05m2HJwwMIzvjoEeNyQHWQ0Cdc/s72-c/1002379782.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_479.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_479.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content