यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात पहापाल येथील गोसंरक्षण संस्थेत एक गंभीर घटना घडली. अंकुरित ज्वारीचे कोंब खाल्ल्याने अनेक जनावरांना ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात पहापाल येथील गोसंरक्षण संस्थेत एक गंभीर घटना घडली. अंकुरित ज्वारीचे कोंब खाल्ल्याने अनेक जनावरांना अन्नविषबाधा झाली. या २२ जनावरे वेदनांनी तडफडून मरण पावली.घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत आपत्कालीन उपचारांद्वारे ७८ जनावरांचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार संस्थेतील जनावरांना त्यांच्या नियमित आहाराचा भाग म्हणून कोवळा ज्वारीचा चारा दिला जात होता. हा हिरवा आणि मऊ चारा खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात, जनावरांमध्ये विषबाधेची गंभीर लक्षणे दिसू लागली. ती बेशुद्ध पडली आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. संस्थेच्या आवारात परिस्थिती अचानक बिघडत असल्याचे पाहून, व्यवस्थापनाने तात्काळ पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबद्दल माहिती दिली. अपघाताचे गांभीर्य ओळखून, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य चालले. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.


COMMENTS