पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात | CrimeNama
Loading ...

पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात

  निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानक बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासू...

 



निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानक बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. परिणामी ऊसासह चारा पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहे.या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, गुणवडी, मळद आणि खांडज येथील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.


 सिंचनासाठी पाण्याच्या शोधात शिरोळकरांची धावपळ

शेतकरी प्रतिनिधींनी निरा डावा कालवा बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या संकटाची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना दिली. कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने अनेक गावांतील शेती कोरडी पडत असून ऊस, हिरवा चारा आणि इतर पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


शिष्टमंडळाने केवळ पाणीटंचाईच नव्हे, तर परिसरातील विविध कृषी व सिंचनविषयक अडचणीही उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. या सर्व मागण्या व सूचनांची सविस्तर माहिती घेत पवार यांनी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.


या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ''बारामतीतील शेतकरी बांधवांच्या हिताशी संबंधित प्रश्नांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल. संबंधित जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे समाधान व्हावे यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,'' असेही त्या म्हणाल्या.


टेंभू'प्रमाणे 'ताकारी'चे आवर्तनही अखंडित सुरू ठेवावे

या भेटीदरम्यान माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, स्वप्नील जगताप, प्रकाश सोरटे, जयपाल देवकाते, अविनाश देवकाते, सुरेश देवकाते, विठ्ठल देवकाते, राजेश देवकाते आदी शेतकऱ्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यांनी पाणीअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची वस्तुस्थिती सांगत कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली.


उसाच्या क्षेत्रावर संकटाचे सावट


पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसत असून, आगामी गळीत हंगामासाठी ऊस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याचा परिणाम पुढील हंगामातील गाळप क्षमतेवर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने विलंब न करता कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी नितीन सातव आदी शेतकऱ्यांनी केली.



'पाणी मिळाले नाही तर पिकांचे मोठे नुकसान'


निरा डावा कालवा बंद राहिल्यास ऊस, चारा आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून, तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे, असे अविनाश देवकाते यांनी सांगितले.पाणी मिळाले नाही तर पिकांचे मोठे नुकसान'


निरा डावा कालवा बंद राहिल्यास ऊस, चारा आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून, तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची गरज आहे, असे अविनाश देवकाते यांनी सांगितले.

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4842,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1773,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,967,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,380,Maharashtra,2145,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,754,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात
पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiv2NQt0_zrArZviPVvmQbWkbDqZAxbKDrco8uCwnpAD3wrUHhYDU0O-JtKLLV27cX8aCzcosKQI9WIuCC3p5E-wpSFlayySEKbRMhT31uDB5ypwtcIaUl9jI1ZNKcM1aVtSzZ7ZZWt8R41TszDAd1Zizip3iyWgsuHmRZCc0FNj24fVqQVyLMN4_lipXI/s320/IMG_20260626_160956.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiv2NQt0_zrArZviPVvmQbWkbDqZAxbKDrco8uCwnpAD3wrUHhYDU0O-JtKLLV27cX8aCzcosKQI9WIuCC3p5E-wpSFlayySEKbRMhT31uDB5ypwtcIaUl9jI1ZNKcM1aVtSzZ7ZZWt8R41TszDAd1Zizip3iyWgsuHmRZCc0FNj24fVqQVyLMN4_lipXI/s72-c/IMG_20260626_160956.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_4486.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_4486.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content