पीएम किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्यांना चांगलीच मदत होत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक भार काही प्रमाणात त्यामुळे उचलला जात आहे. या योजनेच्या ...
पीएम किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्यांना चांगलीच मदत होत आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक भार काही प्रमाणात त्यामुळे उचलला जात आहे. या योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम देशातील ९.४४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९० लाख ९५ हजार ३९ इतकी आहे. पाऊस लांबल्याने खरीप पेरण्याही रेंगाळल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असली तरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एक काम करावे लागणार आहे. ३० जूनपर्यंत एक खबरदारी घ्यावी लागणार आहे. तरच त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून देशभरात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली रक्कम ४.४६ लाख कोटी रुपये झाली आहे. पीएम किसानची रक्कम डीबीटी मार्फत पाठवली जाते. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना २०१९ पासून सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्राकडून दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचे अंतर ठेवले जाते. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन समान हप्ते करून दिली जाते. रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीव्दारे आधार-संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घोळ होण्याची शक्यता कमी होते.
शेतीयोग्य जमिनीची मालकी असणारे कोणतेही शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. याआधी दोन हेक्टर जमिनीची अट ठेवण्यात आली होती. परंतु, नंतर ती रद्द करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे. पीएम किसानच्या २३ व्या हप्त्याची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणं बंधनकारक आहे. जे शेतकरी ई केवायसी करणार नाहीत, त्यांना २३ व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसानच्या पोर्टलवर ओटीपी आधारित ई केवायसी सुविधा सुरु आहे. याशिवाय जवळच्या सीएससी केंद्रावर बायोमेट्रिक ई केवायसी करुन घेता येईल. ई केवायसी करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. या योजनेतील शेतकऱ्यांनी लाभ सुरु ठेवण्यासाठी ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९० लाख ९५ हजार ३९ इतकी आहे. या योजनेचा लाभ यापुढेही कायम मिळत राहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरेने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करमे आवश्यक झाले आहे. अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत.


COMMENTS