मुंबई: मुंबईत अद्याप पावसाला पुरेशी सुरुवातही झालेली नसून वादळी वारेही नाहीत, तरीही गेल्या महिन्याभरात झाड किंवा फांदी पडण्याच्या तब्बल सह...
मुंबई: मुंबईत अद्याप पावसाला पुरेशी सुरुवातही झालेली नसून वादळी वारेही नाहीत, तरीही गेल्या महिन्याभरात झाड किंवा फांदी पडण्याच्या तब्बल सहाशे घटना घडल्या आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यात झाड अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा एक भाग म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जातात.
पावसाळापूर्व कामांमध्ये प्रामुख्याने मृत आणि धोकादायक झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे, खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदी कामे केली जातात. सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्याची छाटणी पालिकेमार्फत केली जाते.
मात्र तरीही दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे अशा तक्रारी पालिकेच्या आपात्कालीन विभागाकडे केल्या जातात. तसेच दरवर्षी अंगावर झाड पडल्यामुळे मृत्यूही होत असतात. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे झाड पडून होणाऱ्या मृत्यूचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्याच महिन्यात १० मे रोजी खार पश्चिमेतील लिंकिंग रोडवर बांधकाम स्थळावरील एक मोठे झाड कोसळून रिक्षावर आदळल्याने दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत १४ वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा मृत्यू झाला तर हर्षिता कुमार (२३) जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
जुलै महिन्यातही देशात सरासरीच्या कमीच पाऊस; जून महिन्यात राज्यात सरासरीहून ४७ टक्के कमी पावसाची नोंद
सभागृहात चर्चा
गेल्याच आठवड्यात खारमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक अंकित प्रभू यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यावर महापालिकेने ठोस भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मृत मुलीच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत करण्याचीही मागणी केली. चर्चेदरम्यान अनेक नगरसेवकांनी खासगी जागांवरील धोकादायक झाडांची पावसाळ्यापूर्वी महापालिकेमार्फत छाटणी करण्यात यावी, अशी मागणी केली. तेव्हा खारमधील झाड कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांना एक लाख रुपये आणि जखमी तरुणीला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल.
याबाबतचे धोरण कडक करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी घोषणा अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केली. महिन्याभरात ५९५ झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी दिनांक १ जून २०२६ पासून आत्तापर्यंत शहरात १६१, पूर्व उपनगरात १४० व पश्चिम उपनगरात २९४ अशा एकूण ५९५ ठिकाणी झाडे / फांद्या पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये ११ लोक जखमी तर १ मृत आहे.


COMMENTS