Solapur Crime : विजय बाबर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर गावात पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ...
Solapur Crime : विजय बाबर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर गावात पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा आवळून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सख्ख्या काकाने पाच वर्षीय चिमुकल्या पुतण्याची दुर्दावीपणे हत्या केलीआपले अनैतिक प्रेमसंबंध उघड होतील या भीतीने काकाने पुतण्याचीच हत्या केली. संबंधित हत्येची माहिती प्राथमिक पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...
आजीचा लाडका समर्थ नाहक मारला गेला
मृत मुलाचं नाव समर्थ यल्लप्पा कास्तार (वय 5) अशी ओळख समोर आली आहे. समर्थ हा आपली आजीसोहत राहत होता, तो काकाकडे जातो असे सांगून घरातून गेला आणि परतलाच नाही. पण काही वेळाने काका अंकुश कास्तारने (वय 25) बेशुद्ध झालेल्या समर्थला ताब्यात घेत आजीच्या घराकडे आणलं. समर्थची परिस्थिती पाहून त्याला बरूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु. समर्थच्या उपचारापूर्वी त्याचा दुर्दैवी अंत झाला.
काकाने समर्थ पत्र्यावरून पडल्याचा खोटा बनाव रचला
काका अंकुशने खोटा बनाव रचून समर्थ पत्र्यावरून पडल्याचं सांगितलं. अंकुशने समर्थ पत्र्यावरून पडल्याची खोटी माहिती सांगून त्याच्या हत्येची माहिती लपवली. या गंभीर स्थितीत समर्थच्या मानेवर आणि हनुवटीवर आणि डोळ्यावर मोठ्या जखमा होत्या. मंद्रुप पोलीस शंकर पटवारी यांनी तपास करत समर्थच्या काकावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचा तपास केला असता, आरोपी अंकुशने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. पोलीस चिमुकल्या समर्थच्या हत्येचं कारण शोधत आहेत. अंकुशचे कोणत्या महिला किंवा तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, याचा पोलीस तपास करत आहेत.


COMMENTS