Crime News : एका महिलेची तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने कार्यालयात घुसून चाकूने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी पॅ...
Crime News : एका महिलेची तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने कार्यालयात घुसून चाकूने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी पॅकर्स अँड मूवर्स कंपनीच्या कार्यालयात ही भीषण घटना घडली.डिंपल असे मृत महिलेचे नाव असून ती याच कंपनीत कार्यरत होती. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.
ब्रेकअप झाल्यानंतर पॅचअपसाठी करत होता प्रयत्न
या प्रकरणात आरोपीचे नाव हरविंदर मान उर्फ हॅरी असे असून, तो डिंपलचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकारी देखील होता. डिंपल आणि हरविंदर गेल्या तीन वर्षांपासून एकाच कार्यालयात काम करत होते आणि पूर्वी ते एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यातील हे नाते संपुष्टात आले होते. ब्रेकअप झाल्यानंतर डिंपलने हरविंदरपासून पूर्णपणे दुरावा ठेवला होता, परंतु हरविंदर मात्र सतत डिंपलवर पुन्हा रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी दबाव टाकत होता आणि तिला मनवण्यासाठी प्रयत्न करत होता.
डिंपलवर चाकूचे वार, क्रूरपणे संपवलं
गुरुवारी सायंकाळी ऑफिसमध्ये काम सुरू असताना हरविंदर तिथे पोहोचला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, आरोपीने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने डिंपलवर ताबडतोब अनेक वार केले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे एकच आरडाओरडा आणि घबराट पसरली. डिंपलवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी हरविंदरने स्वतःवरही त्याच चाकूने वार करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी त्वरित पोलीस व रुग्णवाहिकेला पाचारण केले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असताना डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले. आरोपी हरविंदरची प्रकृती अजूनही नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ते तपासासाठी महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे. प्राथमिक तपासानुसार, हे प्रकरण जुन्या प्रेमसंबंधातून, ब्रेकअपच्या रागातून आणि एकतर्फी दबावातून घडल्याचे दिसून येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पंजाबच्या मोहाली शहरातील सेक्टर-66 जवळ असलेल्या ऑफिसमध्ये ही घटना घडली. डिंपली ही मूळची पटियाला येथील रहिवासी होती.


COMMENTS