'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत | CrimeNama
Loading ...

'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत

 मुंबई : राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर आधारित असलेल्या महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स  या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये रुपाली ...



 मुंबई : राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर आधारित असलेल्या महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स  या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेतील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला आहेत्याचवेळी अशोक खरातच्या भूमिकेत नेमकं कोण आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही.


'आता सगळं उघड होणार...!' ही टॅगलाईन घेऊन येणारा हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी उघड होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

 अशोक खरातच्या कारनाम्यावर चित्रपट


नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक हे या भोंदूचे भक्त असल्याचं समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचं उघडकीस आलं. याच प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.


अशोक खरातच्या या सर्व कारनाम्यावर आता चित्रपट तयार होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत असलेल्या दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला.


रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद


या टीझरमध्ये अभिनेत्री या भोंदू खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. अशोक खरातचा कारनामा उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. नेमका हाच प्रसंग या टीझरमधून समोर आणण्यात आला आहे.


कोणकोणत्या गोष्टी उघड होणार?


दरम्यान, 'आता सगळं उघड होणार...!' हि टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत.


'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहे.


COMMENTS

Name

Agriculture,94,Ahmednagar,88,Amaravati,24,Aurangabad,50,Breakin,4,Breaking,4692,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1717,Dhule,15,Entertainmen,1,Entertainment,99,Gadchiroli,6,Health,492,India,921,Jalgaon,37,Jalna,20,Kolhapur,34,Lifestyle,364,Maharashtra,2058,Mumbai,525,Nagpur,73,Nashik,83,Politics,714,Politics.,4,Pune,2038,Raigad,32,Ratnagiri,25,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,52,Sport,75,Technology,51,World,118,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIrr5zJXMc-Zs0xcD8qB9xgPb43UNWuGGN8H48Lik5XVaZMySbQZeH5Xb_dvYilHR4QgclR1_pM6eT_z7YvP3IW_2wloS8j20kp_XwLQK8l1NRDrDy372AAxtse6VsFrlP-9FE5p9dWBVU7N4JBIxT5KS1FWAeH6fITBqdlrnBS83bD5d5PgmSJbmwnis/s320/IMG_20260626_101229.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIrr5zJXMc-Zs0xcD8qB9xgPb43UNWuGGN8H48Lik5XVaZMySbQZeH5Xb_dvYilHR4QgclR1_pM6eT_z7YvP3IW_2wloS8j20kp_XwLQK8l1NRDrDy372AAxtse6VsFrlP-9FE5p9dWBVU7N4JBIxT5KS1FWAeH6fITBqdlrnBS83bD5d5PgmSJbmwnis/s72-c/IMG_20260626_101229.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_3043.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_3043.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content