Crime News : उत्तर प्रदेशातील चंदौली कोतवाली परिसरातील प्रतापपुरमध्ये शुक्रवारी सकाळी आदर्श इंटर कॉलेजमध्ये तास सुरू असताना एका मुलाने आपल...
Crime News : उत्तर प्रदेशातील चंदौली कोतवाली परिसरातील प्रतापपुरमध्ये शुक्रवारी सकाळी आदर्श इंटर कॉलेजमध्ये तास सुरू असताना एका मुलाने आपल्याच वर्गातील सहकाऱ्यावर हल्ला केला. याच घटनेनं परिसर पूरता हादरून गेला.परिस्थिती पाहता शिक्षक आणि परिसरातील लोकांनी मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी संबंधित किशोरवयीन विद्यार्थ्याला चाकूसह ताब्यात घेतले असून संबंधित प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. प्रतापपूर गावातील आदर्श इंटर कॉलेजच्या खाजगी विद्यालयात गेल्या दहा दिवसांपासून शिकवणीचे वर्ग सुरू होता. या शिकवणी वर्गात फतेहपूर आणि प्रतापपूर गावातील पंधरा विद्यार्थी तासाला उपस्थित होते.
दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गमित्रावर चाकूने केला हल्ला
शुक्रवारी सकाळी 8 वाजता वर्ग सुरू झाला असता, व्यवस्थापकाचा भाऊ असलेला शिक्षक शिवदयाल यादव गणित विषयाचे शिक्षण घेत होते. फतेहपूरच्या इयत्ता दहावीच्या एका विद्यार्थ्याने, आपल्या दप्तरातून चाकू काढला आणि वर्गमित्रावर हल्ला केला. विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, इतक्यात चार दिवसांपूर्वी किशोरवयीन मुलाला पकडून पोलिसांनी ताब्यातआरोपी मुलाचे वडील सियाराम हे जिल्हा रुग्णालयात महिला विभागात कंत्राटी म्हणून कार्यरत होते. त्यांनीच रुग्णालयातून तो चाकू आणला होता. विद्यार्थ्याने तो चाकू विद्यालयात आणला, याबाबतची माहिती कोणालाच नव्हती.
घडलेल्या घटनेनुसार, मृत किशोरवयीन मुलाने आरोपीच्या आईसोबत गैरवर्तन केले होते, ज्यामुळे तो संतप्त झाला होता. मृत मुलाचे वडील बबलू आणि आई तीर्थयात्रेसाठी अयोध्येला गेली होती. पोलीस सर्कस ऑफिसर देवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. दिले.


COMMENTS