एक दृष्टीक्षेप स्त्रीत्वाच्या आरोग्याकडे लेखिका: शितल सतिश शिंदे रोजच्या जीवनशैलीत सकस आहार घेणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. धावपळीच्या ...
लेखिका: शितल सतिश शिंदे
रोजच्या जीवनशैलीत सकस आहार घेणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. धावपळीच्या जीवनात खरेतर प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला हवी. त्यासाठी वेळेवर पोषक जेवण, भरपूर पाणी त्याचबरोबर व्यायाम हा महत्वाचा आहे. याची जाणीव बरेचदा स्त्रियांना मातृत्वामध्ये होते. तर पुरुष हा या गोष्टींकडे लक्ष न देता ही तंदुरुस्त दिसतो.ज्यांची वजने कमी किंवा जास्त असतात ते सर्व फिटनेस क्लब जॉइन करतात. किंवा एखादे वनस्पती औषध यांचा आधार घेतात. खरेतर आज सगळीकडे तंत्रज्ञान वाढत चालले आहे. आणि लोकांची कामे नोकरदार वर्ग ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा 8 ते 10 तास सतत बसून असतो. कामाच्या धावपळीत तो शरीराकडे पाहणे विसरतो. यामुळे अनेकदा सांधेदुखी,कंबरदुखी, वजन वाढ यांसारख्या समस्या उद्भवतात.
त्याचबरोबर स्त्रिया ज्या घरकाम करतात. किंवा त्यांना घरात जास्त काही काम नसते. बऱ्याचदा अतिरिक्त आराम हा देखील हानिकारक ठरतो.म्हणून पूर्वीच्या काळच्या स्त्रिया ज्या आजच्या तुलनेने अधिक कणखर होत्या. आजच्या अशा स्त्रियांमध्ये दमा,थकवा,चरबी,वजन वाढ,सांधेदुखी, व अनेक गंभीर आजार देखील उद्भवतात. आजकाल मासिक पाळीचे वय देखील कमी होत चालले आहे. तीन ते चार वर्षाचा फरक यामध्ये पडतो. डॉक्टरांच्या मते, पोषक आहार न देणं, पालेभाज्या, फळे, कडधान्य याऐवजी मुले फास्ट फूड स्वीट कडे जास्त वळली आहे. त्याचबरोबर टेलिव्हिजन मोबाईल यांसारख्या संवेदनशील कंटेंट मुळे हार्मोन बदल होतांना दिसतो त्यामुळे अशा समस्या उद्भवतात. समवेतच तरुण मुलींमध्ये मासिक पाळी अनियमितता PCOS PCOD सारख्या समस्या खूप वाढत चालल्या आहे. यासाठी योग्य ट्रीटमेंट व योग्य डॉक्टर निवडून आपल्या आहारात पोषक सर्व घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे.
या सर्व बाबी आपण कळत नकळत दुर्लक्षित करतो. परंतु ह्या काटेकोरपणे मातृत्व दरम्यान पाळल्या जातात. कारण अशावेळी योग्य आहार हा माता आणि बालकासाठी खूप गरजेचा असतो. नारळपाणी,फळे,पालेभाज्या, अंडी,डाळी,दही,दूध यांसारख्या आहाराची गरज असते. गरोदर माता ह्या काटेकोरपणे पाळतात.परंतु खरी कसरत असते ती गरोदरपणानंतर मातेची. कारण प्रचंड रक्तस्राव होऊन मातेची स्थिती ही कमकुवत असते. अशावेळी योग्य व पचेल असा आहार घेणे गरजेचे असते. बरेचदा पूर्वी चहा बिस्किटे, अधिक गोड पदार्थ ज्याच्यातून ग्लूटेन भेटेल हा गैरसमज लोकांचा असतो.
आजही ते त्या स्त्रियांना दिले जातात. पण यातून पौष्टिक घटक किंवा ताकद भेटत नाही म्हणू. डॉक्टर वारंवार या गोष्टी सांगत असतात. जड पदार्थ,कडधान्ये,भाजीपाला,फळे टाळले जातात.आणि डाळ अन् मेथीकडे ,बिस्किटे चहा,बाजरी,यांच्याकडे भर दिला जातो. अतिरिक्त मेथी बाजरी यांमुळे स्तनपान करताना अती दुधामुळे,थंडी कणकण ही खूप जाणवते.त्याचबरोबर एक समज मातेला दिली जाते मातेने कडधान्य खाल्यास तिखट,आंबट खाल्यास बाळास ही अपचन होते. त्यामुळे स्त्री अन्नाकडे दुर्लक्ष करते.मुळात मातेचा आहार आणि बालकाच्या पचनसंस्थेचा काहीही संबंध नसतो.कदाचित यामागे मातेने योग्य आहार घ्यावा भुकेपोटी पहिल्यासारखे काही ही खाऊन तिला त्रास होऊ नये हा ही असावा. परंतु ज्याप्रमाणे गर्भाशयात बाळास फक्त पोषक घटक मिळत होते. त्याचप्रमाणे स्तनपान प्रक्रियेदरम्यान पोषक घटक फक्त दूध निर्मितीसाठी घेतले जातात. कोणताही पदार्थ खाताना विचार करते त्यामुळे पोषक सत्व न मिळाल्याने शरीरात ऊर्जा राहत नाही.अशा दिवसात तिला भरपूर प्रमाणात पाणी व सकस आहार गरजेचा असतो. त्याचबरोबर कोणतीही गोष्ट सुरुवातीस एक चमचा खाणे व नंतर पचन होईल तसे घेणे गरजेचे असते. कारण अशावेळी शरीर पूर्ण बदलेले असते. ज्याप्रमाणे बाळाला आपण अन्न सुरू करताना एक एक पदार्थ पचेल तसा देत असतो तसेच मातेच्या शरीराचे देखील तसेच होते.
अशावेळी तिला देखील मुख्यत्वे पोषक आहार,आधार,मालिश यांची गरज असते. त्याचबरोबर ज्या गोष्टी बाळाला किंवा आईला डॉक्टरांनी सांगितल्या असतात त्या काटेकोर पालन करणे गरजेचे असते. जसे की आईस योग्य सकस आहार पालेभाज्या फळे,व बालकांना योग्य तो आहार कसा सुरू करावा ?साखर दोन वर्ष ते मीठ एक वर्षापर्यंत टाळावे. याचे कारण अती कमी वयात मुलांमध्ये शुगर डायबिटीज चे वाढते प्रमाण व आजकाल वाढलेला रासायनिक वापर .एक वर्षाखालील बालक हे मीठ पचू शकत नाही.तर साखर ही आधीच स्तनपानात असते.त्यामुळे अतिरिक्त साखर गरजेची नसते. त्यामुळे नंतर बालके पोषक डाळी खाण्यास नकार देतात.
स्त्रिया आणि बालके यांचा आहार समजून घेताना आरोग्य व प्रत्येकाच्या शरीर प्रतिक्रियेकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
त्यामुळे बरेचदा तुलनात्मक पद्धत न वापरता स्वतंत्र शरीराच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. त्याचबरोबर डिलिवरी नंतर फॅट वाढणे ही सामान्य गोष्ट आहे. पहिल्या तीन ते चार महिन्यात या गोष्टी दुर्लक्षित करून योग्य आहार व जमेल असा व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देऊन बॉडी फिटनेस योग्य हवा तो पोषक आहार आणि व्यायाम करू शकतो.
टीप: वरील लेख हा माहितीपर असून लेखिकेचे स्व मत असू शकते.कोणत्याही गोष्टीचा अवलंब करताना डॉक्टरांचा सल्ला किंवा स्वतःच्या शरीराच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देऊन कराव्या.व शरीरासाठी काही हानिकारक गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.
_लेखिका: शितल सतिश शिंदे



COMMENTS