विंदू दारा सिंग आता त्यांची दुसरी पत्नी दीना उमारोव्हाबरोबर आनंदाने संसार करत आहेत. पण त्यांचं पहिलं लग्न तब्बूची बहीण, अभिनेत्री फराह ना...
विंदू दारा सिंग आता त्यांची दुसरी पत्नी दीना उमारोव्हाबरोबर आनंदाने संसार करत आहेत. पण त्यांचं पहिलं लग्न तब्बूची बहीण, अभिनेत्री फराह नाझ हिच्याशी झालं होतं. दोघांनी १९९६ साली आंतरधर्मीय लग्न केलं होतं, पण २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.आता विंदू यांनी सांगितलं की त्यांचे वडील दारा सिंग यांनी मुस्लीम फराह नाझशी लग्न करण्याबाबत सावध केलं होतं, पण त्यांनी वडिलांचं ऐकलं नाही.
दारा सिंग यांनी विंदू यांना आंतरधर्मीय लग्नातील आव्हानांबद्दल आधीच सावध केलं होतं. हिंदू आणि मुस्लीम असं आंतरधर्मीय लग्न टिकणं खूप कठीण असतं. मात्र विंदू यांनी म्हटलं की लग्न टिकलं नसलं तरी त्यांना त्याचा पश्चाताप नाही, कारण याच लग्नामुळे त्यांना त्यांचा मुलगा फतेह मिळाला.
दारा सिंग धार्मिक सलोख्यावर विश्वास ठेवणारे होते आणि त्यांनी कधीच धार्मिक भेदभाव केला नाही. विंदू दारा सिंग म्हणाले, "आम्ही मानतो हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन हे सगळे भाऊ-भाऊ आहेत. माझे वडील नेहमी हेच सांगायचे."
"ती खूप निर्दयी, मला कधीही मारू शकते"; बॉलीवूड अभिनेत्याचं पत्नीबद्दल वक्तव्य, नेमकं काय घडलं?
'हिंदू-मुस्लीम लग्न टिकणं कठीण असतं'
विंदू दारा सिंग यांनी फराह नाझशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा दारा सिंग यांनी त्यांना सावध केलं होतं. "विंदू, आणखी एक गोष्ट लक्षात ठेव. हिंदू-मुस्लिम लग्ने खूप कठीण असतात," असं दारा सिंग म्हणाले होते. विंदू यांनी पुढे सांगितलं, "जेव्हा मी वडिलांना फराहशी लग्न करायचं हे त्यांना सांगितलं, तेव्हा ते म्हणाले होते की हे खूप कठीण आहे विंदू. शेवटी गोष्टी बिघडतात. त्यावर मी त्यांना म्हणालो होतो की, बाबा, काहीही चुकीचं होणार नाही. पण त्यांनी मला म्हटलं होतं, पुन्हा एकदा विचार कर, कारण अशी लग्ने शेवटी टिकत नाहीत."
Inside Photos: लोकप्रिय अभिनेत्रीने गोव्यात घेतलं २.७ कोटींचं आलिशान घर, एका रात्रीचं भाडं किती? जाणून घ्या…
लग्नाचा पश्चाताप नाही- विंदू दारा सिंग
वडिलांचं म्हणणं खरं होतं, पण तरीही लग्नाचा पश्चाताप नसल्याचं विंदू सांगतात. "मला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नाही, कारण माझ्याकडे फतेह आहे. तो एक खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यावर मी माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो. पण माझे वडील बरोबर होते. नेहमी लक्षात ठेवा की आपले आई-वडील आपल्याला सल्ला देतात, पण आपण त्यांचं ऐकत नाही. आपल्याला वाटतं की त्यांना काय कळतं? पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त समज असते. त्यांच्याकडे मोठा अनुभव असतो आणि ते आपल्यासाठी देवासारखेच असतात. आपल्याला वाटतं आपल्याला सगळं समजतं, पण जेव्हा आई-वडील आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी अडवतात, तेव्हा तो देवाचाच संकेत असतो, त्यामुळे त्यांचं ऐका," असं विंदू दारा सिंग म्हणाले.
"डब्यात किमान १०० लोक असतील…", मुंबई लोकलमधील हत्येप्रकरणी मराठी अभिनेत्याचा संताप; म्हणाले, "कुणी मयंकला…"
धर्मामुळे मोडलं लग्न- विंदू दारा सिंग
धर्मामुळे लग्न मोडलं का? असं विचारल्यावर विंदू म्हणाले, "हो, नक्कीच. सुरुवातीला आमच्या भांडणाचं कारण धर्म नव्हताच. आमच्यात धर्मावरून सगळं सामान्य होतं. पण अचानक ती खूप जास्त धार्मिक झाली. या बदलामुळे आमच्यात असे मतभेद निर्माण झाले, जे आम्हाला हाताळता आले नाही. आमच्या घरात कधीच खूप जास्त धार्मिक वातावरण नव्हते. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती अचानक खूप जास्त धार्मिक होते, तेव्हा अडचणी निर्माण होतात. माझ्या मते, हेच आमच्यातील दुराव्याचं मुख्य कारण आहे."


COMMENTS