अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही घुबाडकुंड सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळताना पहायला मिळतेय. या सिनेमाची कथा, थ्रि...
अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही घुबाडकुंड सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळताना पहायला मिळतेय. या सिनेमाची कथा, थ्रिलर आणि रहस्य यामुळे सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय.दरम्यान अशातच या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वैष्णवी कल्याणकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, 'तुला कधी खऱ्या आयुष्यात विचित्र अनुभव आलाय का?' त्यावेळी तिने एक भंयकर किस्सा शेअर केलाय.
वैष्णवी म्हणाली की, 'एका प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी मी नागपूरला जात होते. ते लोकेशन कुठं होतं याबाबत काहीच आठवत नाही. परंतु प्रवासादरम्यान एक पेट्रोल पंपावर गाडी थांबली. आजूबाजूला तिथं काहीच नव्हतं. परंतु त्या जागेवर एक माणसासारखी दिसणारी आकृती फेऱ्या मारताना दिसली. मी गाडीत झोपले होते. तेव्हा बाकीचे बोलायला आले की, खाली ये तिथं बघ काहीतरी आहे. तेव्हा मी खाली काय आहे? ते बघण्यासाठी उतरले. माझ्यासोबत कोणाला तरी घेतलं आणि त्या आकृतीच्या दिशेने जात होते. आवाज दिला तरी तिकडून प्रतिक्रिया येत नव्हती. मग मला धडधडायला लागलं.'
वैष्णवी पुढे म्हणाली की, 'गाडीतून पाहिलं तेव्हा सुद्धा ती आकृती तशीच फेऱ्या मारत होती. त्यानंतर आम्ही सगळे हॉटेलवर पोहोचलो. मी एकटीच मुलगी असल्यानं मला वेगळी रुम दिली. काही वेळात मला खूप भास व्हायला लागले. डोळे बंद केल्यावर तेच दिसायला लागलं. शेवटी मी अडीच - तीन वाजता किरणला फोन केला. त्याला सांगितलं की मला खूप जास्त भिती वाटतेय. मला असं काही दिसलं वगैरे. शेवटी मला सकाळी साडेसहाला झोप लागली. ' असं वैष्णवी म्हणाली.


COMMENTS