यंदाच्या मान्सूनबाबत शंकाच!; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत..! | CrimeNama
Loading ...

यंदाच्या मान्सूनबाबत शंकाच!; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत..!

  जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा एक थेंब नाही. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आशेने पाहत आहे. पेरण्या राखडल्या आहेत. दर ...

 


जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा एक थेंब नाही. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आशेने पाहत आहे. पेरण्या राखडल्या आहेत. दर वर्षी जून संपेपर्यंत 90 ते 95 टक्के पेरण्या झालेल्या असतात.यंदा 2 टक्केही पेरण्या नाहीत. आकडेवारी नुसार राज्यात जून महिन्यात 80 टक्के पाऊस कमी झाला आहे. ज्या कोकण मध्ये सर्वाधिक पाऊस जून मध्येच होतो त्या कोकणात 86 टक्के पाऊस कमी झाला आहे. अनेक धरणांनी तळ गाठला आहे. 'अलनिनो' चा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला असल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतांना दिसतोय असं भारतीय हवामान ( IMD ) सांगत असलं तरी जूनच्या पाऊसाची तूटची भरपाई होणार नाही.


यंदा च्या मान्सून ला 'अलनिनो'ची नजर लागली आणि हवामान विभागच्या अंदाजानुसार पाऊस लांबला. पाऊस नसल्याने राज्यासमोर मोठं संकट उभं राहू शकतं अशी भितीही आहे. अलनिनोमुळे पाऊस लांबला आहे. दर वर्षी जून महिन्याच्या पावसाचा विचार केला तर सरासरी पेक्षा 80 टक्के पाऊस कमी पडला आहे. तर कोकणात तब्बल 86 टक्के कमी पाऊस काही जिल्ह्यात पावसाचा एक थेंब ही पडला नाही.


यंदाचा पाऊस अंदाजावर शंका


'अलनिनो'च्या परिणामामुळे हवामान अंदाज बांधन कठीण आहे. अनेकदा अंदाज चुकले आहेत. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) जी माहिती दिली आहे की कोकणात 23 जूनपासून पावसाचा जोर धरेल. कोकणात या काळात धोधो पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात काही भागात पावसाला सुरवात होणार आहे मात्र त्याच वेळी विदर्भ -मराठवाड्यात कमी किंवा मध्यम पाऊस असेल. त्यामुळे हा अंदाज पाहता जुलैच्या सुरूवाती पर्यंत पेरणी सारखा पाऊस पडेल का? या बाबतचा अंदाज बाबत शंका व्यक्त केली जातेय. 23 जून म्हणजेच आज पासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाणे दीला आहे. काही भागात पावसाला सुरवात झाली असली तरी हवा तसा पाऊस पडेलच असं अजून तरी स्पष्ट नाही यामुळे यंदाच वर्ष कसंकसं जाईल याबाबत सर्वांच्या मनात शंकाच आहे.


कृषि क्षेत्राला मोठा फटका -


जून महिना संपत आला तरी हवा तसा पाऊस नाही. जून महिन्यात वेळेवर चांगला पाऊस झाला तर 90 टक्के पेरण्या शेतकरी आटोपून घेतात, यंदा आतापर्यंत फक्त 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. वेळेवर पेरण्या झाल्या तर उत्पादनही चांगल येतं. उशिराने पेरण्या झाल्या तर उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे शेतकऱ्यांच् ही मोठं आर्थिक नुकसान होतं. त्याच बरोबर भारतीय धान्य कोठारांवरही परिणाम होतो. भारतीय अर्थव्यवस्था 60 ते 65 टक्के कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. आणि कृषि क्षेत्र पाऊसावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होतो. पाऊस कमी झाला तर ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते. कृषी क्षेत्रावर शेतकरी, शेतमजूर, खत- बियाणे कारखाने तसच विक्रेते,दळवळण, आयात निर्यात, दुग्धजन्य पदार्थ, कापड उद्योग,कृषी उद्योग, फूड पॅकिंग भाजीपाला यासारखे सर्वसामान्यना लागणारे रोजच्या वस्तूशी थेट कृषीशीच आहे.वर्षाचे शेअर मार्केट ही मान्सून अंदाजावरच उघडत पाऊसाचा अंदाज चांगला असेल तर शेअर मार्केट ही उंच भरारी घेत असं आतापर्यंत पाहण्यात आलं आहे.


धरणात पाणी साठा कमी -


पाऊस नसल्यामुळे राज्यातील लहान-मोठे धरणात पाणी साठा प्रचंड खालावला आहे. काही धरणात तर तळ गाठला आहे. यामुळे पाण्याचे देखील मर्यादित साठा उरला आहे. सध्या राज्यात सरासरी 24 टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी पर्यंत 33 टक्के पर्यंत हा साठा होता. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक धरणातून गावाला पाणी पुरवठा तसंच शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी शेतकरी करतात मात्र सरकारने पाण्याची आणीबाणी लक्षात घेता शेतकऱ्यांना पाणी उपस्यावर बंदी घातली आहे. पाऊस जो पर्यंत येत नाही तो पर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवले आहे. पाऊस लांबला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. पिण्याच्या पाण्याचं मोठं संकट येईल.यामुळे पाण्याचा उपसा बंद केला आहे.


पेरणीची घाई करू नका - मुख्यमंत्री


जून महिन्यात 80 टक्के पाऊस कमी झाला आहे. पावसाअभावी सर्वच जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. जुलै महिण्याच्या सुरवातीला पर्यंत पाऊसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्या सरकार पेरण्यांबाबत वेळोवेळी सूचना देईलच. पाऊस नसल्याने गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू अस आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनआधी पत्रकार परिषदेवेळी स्पष्ट केल आहे. सरकार पेरणी बाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी सुचना करेल असं ही मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

जून महिना संपत आला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा एक थेंब नाही. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आशेने पाहत आहे. पेरण्या राखडल्या आहेत. दर वर्षी जून संपेपर्यंत 90 ते 95 टक्के पेरण्या झालेल्या असतात. यंदा 2 टक्केही पेरण्या नाहीत. आकडेवारी नुसार राज्यात जून महिन्यात 80 टक्के पाऊस कमी झाला आहे. ज्या कोकण मध्ये सर्वाधिक पाऊस जून मध्येच होतो त्या कोकणात 86 टक्के पाऊस कमी झाला आहे. अनेक धरणांनी तळ गाठला आहे. 'अलनिनो' चा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला असल्याने राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतांना दिसतोय असं भारतीय हवामान ( IMD ) सांगत असलं तरी जूनच्या पाऊसाची तूटची भरपाई होणार नाह


यंदाचा पाऊस अंदाजावर शंका


कृषि क्षेत्राला मोठा फटका -


धरणात पाणी साठा कमी -


पेरणीची घाई करू नका - मुख्यमंत्री


📰 न्यूज आणि विशेष

COMMENTS

Name

Agriculture,98,Ahmednagar,89,Amaravati,24,Aurangabad,52,Breakin,4,Breaking,4835,Buldhana,19,Chandrapur,5,Cooking,6,Crime,1771,Dhule,16,Entertainmen,1,Entertainment,100,Gadchiroli,6,Health,498,India,963,Jalgaon,38,Jalna,21,Kolhapur,36,Lifestyle,379,Maharashtra,2142,Mumbai,540,Nagpur,77,Nashik,85,Politics,753,Politics.,7,Pune,2069,Raigad,32,Ratnagiri,26,Sangali,39,Satara,54,Sindhudurg,7,Solapur,53,Sport,79,Technology,57,World,124,World.,5,पुणे,3,महाराष्ट्र,4,
ltr
item
CrimeNama: यंदाच्या मान्सूनबाबत शंकाच!; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत..!
यंदाच्या मान्सूनबाबत शंकाच!; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत..!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyw2tqT3Vh3Qw4ak9z9o220AvCDZaAwbawqTWHCG5TJx5YD19Fy27dadnG69240KqKohFTdr3Agq_Kvhq4jrhgGVvjPvzTsE4KttBHJKuYA44AuObuaEvj2t_CHCUQThCxn2F86xrshA9oZpcIeeHEgLbmeWipNOp_WCbg0GF6RTL9VxOTIUNPqHDjh7c/s320/n71717446617822987989080e8d1d1154a71e1c5349e11c5b60878bbbfc14ce1e11e4c9446b6ed56a5dc9b9.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyw2tqT3Vh3Qw4ak9z9o220AvCDZaAwbawqTWHCG5TJx5YD19Fy27dadnG69240KqKohFTdr3Agq_Kvhq4jrhgGVvjPvzTsE4KttBHJKuYA44AuObuaEvj2t_CHCUQThCxn2F86xrshA9oZpcIeeHEgLbmeWipNOp_WCbg0GF6RTL9VxOTIUNPqHDjh7c/s72-c/n71717446617822987989080e8d1d1154a71e1c5349e11c5b60878bbbfc14ce1e11e4c9446b6ed56a5dc9b9.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_272.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_272.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content