अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट 'गुन्हा' दाखल केला; माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप. | CrimeNama
Loading ...

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट 'गुन्हा' दाखल केला; माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप.

  मल्लेवाडी: एकी कडक उन्हामुळे शेतातील पिके डोळ्यादेखत जळून चालली आहेत, तर दुसरीकडे उजनी धरण भरलेले असूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे माण नद...

 


मल्लेवाडी: एकी कडक उन्हामुळे शेतातील पिके डोळ्यादेखत जळून चालली आहेत, तर दुसरीकडे उजनी धरण भरलेले असूनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे माण नदीपात्रात पाणी सोडले जात नाही.

या निषेधार्थ माण संघर्ष समिती आणि नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांनी पंढरपूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मल्लेवाडी येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.


अखेर अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र हक्काचे पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच मंगळवेढा पोलिसांनी 'जमावबंदी आदेशाचा भंग' केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.


'उजनी' भरूनही पिके जळाली; प्रशासनाचे 'सोयीस्कर' दुर्लक्ष


गतवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. असे असतानाही प्रशासनाला शेतकऱ्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन करता आले नाही. कधी कालव्याला तर कधी नदीला पाणी सोडण्यास जाणीवपूर्वक उशीर केला गेला.


मे महिन्यातच माण संघर्ष समितीने उजनी कालवा क्रमांक ५२ च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, माण नदीत पाणी न सोडल्यास २ जून रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी या इशाऱ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.


महामार्गावर वाहनांच्या रांगा; ३ तासांनंतर प्रशासन नमले


मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास शेकडो शेतकरी मल्लेवाडी जवळ रस्त्यावर ठाण मांडून बसले. उजनीचे अधिकारी घटनास्थळी फिरकण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला. तब्बल तीन तास पंढरपूर आणि विजापूरकडे जाणारी शेकडो वाहने अडकून पडली होती. अखेर दुपारी १२.३० वाजता अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत तात्काळ पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. "आज रात्रीपासूनच पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल," अशी माहिती शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर हेंबाडे यांनी दिली.


पाणी मागणाऱ्या 'या' शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल:


मंगळवेढा पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि रस्ता अडवल्याप्रकरणी खालील प्रमुख कार्यकर्त्यांसह १० ते १५ अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.


संजय पवार (घरनिकी), दीपक जाधव (सिद्धेवाडी)

बबन रोकडे (मुढवी), विवेक चौगुले (मल्लेवाडी),सिद्धेश्वर मोरे, लक्ष्मण मोरे, सिद्धेश्वर हेंबाडे (ढवळस), मारुती मस्के, आदिनाथ शिंदे (शिरगाव)


शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मरवडे येथेही शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. पिके वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या अन्नदात्याला गुन्हेगारासारखी वागणूक देणे अत्यंत संतापजनक आहे.-सिध्देश्वर हेंबाडे, शेतकरी नेते.

COMMENTS

Name

Agriculture,73,Ahmednagar,86,Amaravati,18,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,4114,Buldhana,16,Chandrapur,2,Cooking,2,Crime,1517,Dhule,14,Entertainment,57,Gadchiroli,5,Health,452,India,760,Jalgaon,32,Jalna,18,Kolhapur,26,Lifestyle,326,Maharashtra,1772,Mumbai,431,Nagpur,51,Nashik,69,Politics,617,Pune,1920,Raigad,25,Ratnagiri,19,Sangali,34,Satara,49,Sindhudurg,5,Solapur,45,Sport,65,Technology,33,World,70,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट 'गुन्हा' दाखल केला; माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप.
अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट 'गुन्हा' दाखल केला; माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUkAMuhqJ3y23KXIdrzqZyjF5qSGg6Bn43Na9gefYUFePpZ5HFRar6vc_vPt2ac7LAEAv6aQqh7EQDplyIF8RMNDcx5PJ4p2OAtUwaMChVulO41QxtLd6ZNI7iQJ3x0mYhgwky6MKCjBVVLpvIuMk_AN3ypfw7eXdSU6aKchXc3QhmzrQKnDRtUovFweY/s320/n7146339111780457536522dc2a92941fcf50793aaf476b8d3f0250d6ca76ba72f2c75791b05bd836dd34aa.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgUkAMuhqJ3y23KXIdrzqZyjF5qSGg6Bn43Na9gefYUFePpZ5HFRar6vc_vPt2ac7LAEAv6aQqh7EQDplyIF8RMNDcx5PJ4p2OAtUwaMChVulO41QxtLd6ZNI7iQJ3x0mYhgwky6MKCjBVVLpvIuMk_AN3ypfw7eXdSU6aKchXc3QhmzrQKnDRtUovFweY/s72-c/n7146339111780457536522dc2a92941fcf50793aaf476b8d3f0250d6ca76ba72f2c75791b05bd836dd34aa.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_267.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2026/06/blog-post_267.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content