नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या...
नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे.तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या निदा खानची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. "होय, मीच पीडितेला माझ्या घरी घेऊन गेले होते आणि तिथे तिला नमाज पठणाचे प्रशिक्षण दिले" अशी स्पष्ट कबुली निदा खान हिने तपास यंत्रणांसमोर दिली आहे. एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या युवतीचं अशा प्रकारे ब्रेनवॉश करून तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याच्या या कबुलीमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक पोलिस अत्यंत गांभीर्याने या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत आहेत. या रॅकेटचे धागेदोरे कुठेकुठे पसरले आहेत, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. उद्यापासून म्हणजे ९ जूनपासून या प्रकरणी नियमित सुनावणी होणार आहे.
निदा खान हिच्या या थेट कबुलीमुळे हे प्रकरण केवळ लैंगिक छळापुरते मर्यादित नसून, यामागे एक मोठे संघटित धर्मांतर रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीडित युवतीवर नेमका कसा दबाव आणला गेला? या कटात कंपनीतील किंवा बाहेरील आणखी किती लोकांचा सहभाग आहे? याचा सखोल तपास आता पोलिस करत आहेत.


COMMENTS